ठाणे: फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एंजेल वन लिमिटेडने एंजल वनच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे वापरून तोतयागिरी करणाऱ्या फसव्या सोशल मीडिया गटांच्या वाढत्या व्याप्तीबद्दल गुंतवणूकदारांना सतर्क करते. एंजेल वनशी संबंध असल्याचा खोटा दावा करून सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक अनधिकृत गट तयार होत असल्याचे कंपनीचे निरीक्षण आहे.
आवश्यक सेबी (SEBI)नोंदणी-परवानगीशिवाय सिक्युरिटीजशी संबंधित सल्ला किंवा शिफारसी प्रदान करणे, तसेच सेबीच्या मंजुरीशिवाय सिक्युरिटीजशी संबंधित परतावा आणि कामगिरीबद्दल अनधिकृत दावे करणे, अशा बेकायदेशीर गोष्टींमध्ये हे फसवे गट गुंतले आहेत, हे एंजेल वनने ओळखले आहे. व्हॉट्सॲप आणि टेलीग्राम ग्रुप एंजल वन लिमिटेडचे ब्रँड नाव आणि लोगो तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आणि प्रतिमा यांचा बेकायदेशीरपणे आणि भ्रामकपणे गैरवापर करत आहेत. आणि ते एंजल वन लिमिटेडशी संबंधित आहेत, असा विश्वास ठेवत सर्वसामान्यांची दिशाभूल करत आहेत.
‘अनधिकृतरित्या गुंतवणुकीचा सल्ला देणे किंवा सिक्युरिटीज मार्केटमध्ये परताव्याची हमी देणे हे कायद्याने निषिद्ध आहे. त्यामुळेच आम्ही गुंतवणूकदारांना योग्य ती माहिती घेण्यास तसेच आमच्या संस्थेकडून व्यवहार झाल्याचा किंवा माहिती मिळाल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही घटनेची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन करू इच्छितो. कायदेशीर गुंतवणुकीचे निर्णय नेहमी सखोल संशोधन आणि अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित असावेत. एंजेल वन लिमिटेडचा कोणत्याही बनावट ॲप्लिकेशन्स, वेब लिंक्स किंवा खासगी व्हॉट्सॲप, टेलीग्राम ग्रुप्सशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही आणि फसव्या ॲप्लिकेशन्स किंवा वेब लिंक्सच्या व्यवहारामुळे होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानासाठी किंवा परिणामांसाठी ते जबाबदार राहणार नाहीत,’ असे एंजेल वनने म्हटले आहे.
कंपनी ग्राहकांना अनधिकृत सोशल मीडिया गटांमध्ये जोडत नाही, तर संवेदनशील वैयक्तिक माहितीची विनंती मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे करत नाहीत, अनधिकृत चॅनेलद्वारे निधीची मागणी करत नाही किंवा हमी परतावा देण्याचे आश्वासनही देत नसल्याचे एंजेल वनने स्पष्ट केले आहे. सर्व कायदेशीर व्यवहार फक्त एंजेल वनच्या अधिकृत प्लॅटफॉर्मद्वारेच केले जावेत आणि अर्ज केवळ अधिकृत स्रोत आणि अधिकृत ॲप स्टोअरमधून डाउनलोड केले जावेत. एंजेल वन गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षित व्यापार पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व गुंतवणूकदारांना सतर्क राहण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी कंपनी प्रोत्साहन देते. अशा संस्थांशी जोडले जाऊ नका, तसेच कोणत्याही संशयास्पद गोष्टींची माहिती त्वरित कायदेशीर यंत्रणांना द्या, असा सल्ला जनतेला दिला जातो. तुम्हाला कोणतेही संभाव्य घोटाळे आढळल्यास ते सायबर क्राईम पोर्टलद्वारे cybercrime.gov.in तसेच १९३० या हेल्पलाइनवर कॉल करून किंवा तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन नोंदवले जाऊ शकतात.