मुंबई:स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करत अरिहंत अकॅडमी या भारतातील आघाडीच्या कोचिंग संस्थेने झील अकॅडमीच्या संपादनाची घोषणा केली आहे. या धोरणात्मक विलिनीकरणामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांना उच्च-स्तरीय अध्यापन, संसाधने व वैयक्तिकृत मार्गदर्शन उपलब्ध होईल.विद्यार्थ्यांना ही बातमी ऐकून आनंद झाला आहे. अरिहंत अकॅडमीने नेहमी सर्वोत्तमतेला प्राधान्य दिले आहे, तसेच त्यांचा अनेक टॉपर्स घडवण्याचा प्रमाणित ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यांचे अनुभवी शिक्षकवर्ग, तसेच विद्यार्थी-केंद्रित दृष्टीकोनाने अनेक महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने साकारण्यास मदत केली आहे. आता, समाविष्ट करण्यात आलेले झील अकॅडमीचे स्थानिक कौशल्य आणि वैद्यकीय व्यावसायिकांवर फोकससह अरिहंत अकॅडमी अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी सुसज्ज आहे. अकॅडमी कोर्सेसची व्यापक श्रेणी देते, जसे इयत्ता ८वी ते १०वी साठी फाऊंडेशन कोर्सेस, इयत्ता ११वी व १२वी साठी स्पर्धात्मक परीक्षांकरिता तयारी, जेईई मेन अँड अॅडवान्स्ड आणि ‘नीट’वर (NEET) फोकस.
दुसरीकडे झील आपल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आयआयटी जेईई व नीट (NEET) परीक्षा तयारीमधील यशाच्या प्रमाणित ट्रॅक रेकॉर्डसाठी प्रसिद्ध आहे. या संपादनासह झील अकॅडमीला अरिहंत अकॅडमीच्या अनेक संसाधनांसह स्टडी मटेरिअल्सची व्यापक लायब्ररी, प्रगत अध्यापन तंत्रे आणि अनुभवी शिक्षकवर्गाचा फायदा होईल, ज्यामधून विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्वांगीण शिक्षणाची खात्री मिळेल.या सहयोगाचा आणखी एक उत्साहवर्धक पैलू म्हणजे उपलब्धता वाढवण्याची क्षमता. अरिहंत अकॅडमीची संपूर्ण मुंबईमध्ये उपस्थिती आहे, तर झील अकॅडमीचे स्थानिक कनेक्शन्स तफावत दूर करण्यास मदत करू शकतात आणि उच्च दर्जाचे शिक्षण नवीन मुंबई, तसेच शहरातील दुर्गम भागांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची खात्री घेऊ शकतात. याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांना भौगोलिक अडथळ्यांमुळे शिक्षणासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही किंवा तडजोड करावी लागणार नाही.
अरिहंत अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कपासी म्हणाले, ‘हे संपादन विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी अधिक दृढ करण्याची खात्री देते, तसेच त्यांना अधिक सर्वसमावेशक व प्रबळ शैक्षणिक आराखडा देते. सहयोगाने, आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ध्येयांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी उच्च-स्तरीय शिक्षण आणि वैयक्तिकृत लक्ष देऊ. सहयोगाने आम्ही आमचा अभ्यासक्रम वाढवू शकतो, नवीन प्रोग्राम्स सादर करू शकतो आणि विद्यार्थ्यांना अध्ययनाप्रती अधिक सर्वांगीण दृष्टीकोन देऊ शकतो. हा सहयोग विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांसह त्यांच्या शैक्षणिक ध्येयांमध्ये निपुण होण्यास सक्षम करेल.’
हा सहयोग अध्ययन अनुभवामध्ये वाढ होण्याची खात्री देतो. अरिहंत अकॅडमीचा प्रबळ अभ्यासक्रम, झील अकॅडमीचा व्यावहारिक उपयोजनावरील फोकस विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण देईल, जे त्यांना परीक्षांसह वास्तविक विश्वातील आव्हानांचे निराकरण करण्यास सुसज्ज करेल. दैनंदिन मॉक टेस्ट्स व नियमित क्लासेस विद्यार्थी त्यांच्या तयारीमध्ये अग्रस्थानी राहण्याची आणि वेळेवर अभिप्राय मिळण्याची खात्री देतील.
झील अकॅडमीचे पार्टनर कुणाल पाठक म्हणाले, ‘आम्हाला अरिहंत अकॅडमीसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. आमच्या स्थानिक कौशल्याला अरिहंत अकॅडमीच्या प्रमाणित अध्यापन पद्धतींसह एकत्रित करत आम्ही महानगर प्रांतामधील विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक अध्ययन अनुभव निर्माण करू शकतो, ज्यामुळे अद्वितीय संधींसह अपवादात्मक अध्ययन अनुभव मिळतील.’
अरिहंत अकॅडमीकडून झील अकॅडमीचे संपादन मोठा टप्पा आहे, जिथे हा सहयोग विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीचा प्रमाणित ट्रॅक रेकॉर्ड आणि झील अकॅडमीच्या स्थानिक कौशल्यांमधून फायदा घेण्याची अद्वितीय संधी देतो. विद्यार्थी हा सहयोग भावी शिक्षणाला कशाप्रकारे आकार देईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण क्षमता संपादित करण्यास सक्षम करेल हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत.