अभिनेत्री पल्लवी जोशी झळकणार अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात!

मुंबई: अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी. त्यांच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीमध्ये त्यांनी दूरचित्रवाणीपासून चित्रपटांपर्यंत विविध माध्यमांतून काम केलं आहे आणि आज त्या एक प्रभावशाली चित्रपट निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. आपल्या भूमिकांमधील सखोल समज आणि प्रभावी सादरीकरणासाठी पल्लवी जोशी यांना ओळखले जाते. त्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळी छाप सोडतात.

‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’सारख्या चित्रपटांमधून भरघोस यश मिळवल्यानंतर पल्लवी जोशी आता त्यांच्या आगामी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या समाज माध्यमातून पल्लवी जोशी यांचा पोस्टर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकेचा परिचय दिला आहे.