दुबई जागतिक व्यवसाय विस्तारासाठी सर्वाधिक पसंतीचे केंद्र
दुबई: जीएमबीएफ ग्लोबल (GMBF Global) आयोजित महाबीझ २०२६ (MahaBiz 2026) या आंतरराष्ट्रीय व्यवसाय संमेलनाला चारही देशांतील प्रेस ब्रिफिंगनंतर अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. भारत, लंडन (यूके), सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या माहिती-सत्रांमुळे जगभरातील उद्योगपती आणि व्यावसायिकांना महाबीझ २०२६विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
जागतिक व्यापाराच्या केंद्रस्थानी असलेलं दुबई उद्योजक, एमएसएमई (MSMEs), गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ व्यावसायिकांसाठी सतत आकर्षण ठरत आहे. रणनीतिक भूस्थान, व्यवसाय सुलभ धोरणं, जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि जीसीसी (GCC), एमईएनए (MENA), आफ्रिका, युरोप आणि दक्षिण आशियाशी असलेल्या थेट कनेक्टिव्हिटीमुळे दुबई आज जागतिक व्यवसाय विस्तारासाठी सर्वोत्तम ‘गेटवे’ ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाबीझ २०२६ हे सीमापार व्यवसायवृद्धीसाठी एक योग्य आणि महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे.
जागतिक स्तरावरील सहभाग — विविध देशांतील नेत्यांनी मांडले विचार
महाबीझ २०२६ च्या जागतिक प्रचार मोहिमेचा भाग म्हणून :
• डॉ. साहित्य चतुर्वेदी यांनी लंडन, यूकेमध्ये माहिती – सत्र घेतलं. भारतीय आणि दक्षिण आशियाई व्यावसायिक समुदायाने यूएई आणि आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या संधींबद्दल मोठी उत्सुकता दर्शवली.
• सीए संजय गगरानी यांनी सिडनी, ऑस्ट्रेलिया मधील सत्राचे नेतृत्व केले. तंत्रज्ञान, सेवा, ट्रेडिंग आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील उद्योजकांनी दुबई–ऑस्ट्रेलिया व्यवसाय सहकार्यास मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला.
• सीए अजय वासवानी यांनी बँकॉक, थायलंड येथील उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना संबोधित करताना दुबई–असेअन (ASEAN) व्यापार आणि गुंतवणूक संबंध कसे वाढत आहेत हे अधोरेखित केले.
• भारतामध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक येथे झालेल्या प्रेस ब्रिफिंगमध्ये एमएसएमई (MSMEs), स्टार्टअप्स, उत्पादन क्षेत्र, निर्यातदार आणि उद्योग संघटनांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. भारतामधील प्रसार मोहिमेसाठी ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’(जीएमबीएफ) ग्लोबल दुबई युएईचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजारेकर, महासचिव विवेक कोल्हटकर, आयोजन सचिव नितिन सास्तकर, संपर्क माध्यम तज्ञ अशोक सावंत, देवा सोळंकी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक सत्रात कॉन्टॅक्ट्स टू कॉन्ट्रॅक्ट (Contacts to Contracts) या महाबीझच्या संकल्पनेवर भर देण्यात आला. ही संकल्पना सीमापार सहयोग निर्माण करण्याच्या जीएमबीएफ ग्लोबलच्या ध्येयाशी जोडलेली आहे.
प्रत्येक क्षेत्रासाठी जागतिक व्यवसाय मंच
महाबीझ २०२६ मध्ये १८ हून अधिक देशांतले प्रतिनिधी सहभागी होणार असून उत्पादन, सेवा, तंत्रज्ञान, ट्रेडिंग, लॉजिस्टिक्स, कन्सल्टिंग, कृषि-आधारित उद्योग, हेल्थकेअर, शिक्षण अशा विविध क्षेत्रांचा समावेश असेल.
या संमेलनातून सहभागींसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत :
• आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग आणि भागीदारी
• संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान भागीदारी
• जीसीसी, एमईएनए आणि आफ्रिका बाजारपेठांमध्ये प्रवेश
• गुंतवणूकदार आणि फंडिंग कनेक्शन
• बायर – सेलर मीट
• यूएईच्या व्यवसायसुलभ पर्यावरणाचा लाभ
जीएमबीएफ ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर यांनी सांगितले, ‘दुबई शहर जागतिक संधींचे केंद्रबिंदू आहे. भारत, यूके, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे स्पष्ट आहे की जगभरातील उद्योजक व्यवसायवृद्धीसाठी दुबईकडे बघत आहेत. महाबीझ २०२६ एक दुवा आहे. महत्त्वाकांक्षा आणि संधी यांना जोडणारा, संपर्कांना करारांत रूपांतरित करण्याची संधी देणारा! ‘
महाबीझ२०२६विषयी…
महाबीझची नववी आवृत्ती ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबईत होणार आहे. दोन दिवसीय प्रीमियम आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संमेलन जीएमबीएफ ग्लोबल तर्फे आयोजित केलं जाणार असून जगभरातला व्यावसायिक समुदाय, गुंतवणूकदार, उद्योग संघटना आणि तज्ज्ञांना एकत्र आणणार आहे.
जीएमबीएफ ग्लोबलविषयी
जीएमबीएफ ग्लोबल (Gulf Maharashtra Business Forum) ही दुबईस्थित ना-नफा संस्था असून महाराष्ट्र, मध्यपूर्व, आफ्रिका आणि जागतिक बाजारपेठांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्य वाढवण्यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. सहयोग आणि व्यावसायिक परस्परसंबंधांना चालना देणारा एक सशक्त मंच तयार करणे हे संस्थेचे ध्येय आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.mahabiz2026.com