गणेशोत्सवात विद्यानिधी शैक्षणिक संकुलात मातृशक्तीचा पर्यावरण पूरक देखावा!

मुंबई: जुहू येथील विद्यानिधी शैक्षणिक संकुलात यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी शैक्षणिक संकलातील वातावरण आनंदाने भारावून गेले होते. गणेशोत्सव साजरा करताना मातृशक्तीला वंदन करणारा पर्यावरण पूरक देखाव्याची निर्मिती करण्यात आली होती. शैक्षणिक संकुलातील १४ विद्या शाखांतील विद्यार्थी व पालकांनी कलानिधी गणपतीचे दर्शन घेतले. माजी विद्यार्थ्यांच्या आरती गायनाने बाप्पांचा सभामंडप चैतन्याने भारावून गेला होता. उपनगर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश मेहता. कार्याध्यक्ष संजीव मंत्री, सचिव डॉ. साधना मोढ व आजीवन सदस्य डॉ. कीर्तीदा मेहता, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील गणमान्य व्यक्ती यांनी बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला.

गणेशोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्सव काळात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. चित्रकला, रंगभरण, रांगोळी,मुकुट निर्मिती,स्मरणशक्ती शाडूच्या गणेश मूर्ती तयार करणे, श्लोक पाठांतर, नृत्य-गायन, मेहंदी, आनंदमेळा यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. निर्माल्यापासून खत- निर्मिती गणेशोत्सव काळात श्रींच्या चरणी अर्पण होणाऱ्या फुलांच्या निर्माल्यापासून’निर्माल्य शक्ती’ या पर्यावरण पूरक खताची निर्मिती केली जाते. शैक्षणिक संकुलात येणाऱ्या पाहुण्यांना निर्माण्यशक्ती भेट म्हणून देण्यात येते. उत्सव काळात शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. शाळेच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात श्रींच्या पार्थिव मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कमला रहेजा आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मातृशक्तीची महती सांगणाऱ्या समर्पक देखाव्याची निर्मिती केली होती.