मुंबई:अंधेरीच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलामध्ये आषाढी एकादशी निमित्ताने टाळ मृदंगासह विठ्ठल नामाचा गजरात दिंडी काढण्यात आली. शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात दैनंदिन सकाळी मॅार्निंग वॅाक करुन मग योग प्रकारात ओमकार व विठ्ठल नाम जप करणाऱ्या ओमकार समूहाच्या (ग्रुप) ५० ज्येष्ठ नागरीकांनी आज सकाळी फूटबॅाल स्टेडियममधून संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत टाळ मृदंगासह विठ्ठल नामाचा गजर करीत दिंडी काढली. या दिंडीमध्ये अंधेरीच्या राम मंदिराचे प्रमुख विश्वस्त अरविंद पाटील, अनिल घोसाळकर, अशोक सावंत,सुरेश सावंत, अशोक विचारे, डॉ.विजय पिसाट आदींचा सहभाग होता.