मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘देवमाणूस – मधला अध्याय’ येत्या २ जूनपासून प्रदर्शित होणार असून. मालिका पहिल्या प्रोमो पासूनच चर्चेत आहे. आणि हल्लीच हिम्मतराव टेलर शॉपच उदघाटन करायला महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर पोहचली होती. आता अजून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रोमो प्रदर्शित झाला. या प्रोमोनं प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या प्रोमोमध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचा सहभाग. प्रोमोमध्ये गोपाळ काम करत असतो, आणि तेवढ्यात अलका कुबल तिथं येतात. त्या विचारतात, “ते वर्ल्ड फेमस गोपाळराव टेलर तुम्हीच का?” यावर गोपाळ आश्चर्याने म्हणतो, “अलका ताई! आमच्या गरीबाच्या दुकानावर?” अलका ताई त्याला सांगतात की त्या माहेरच्या साडीचा ब्लाउज शिवण्यासाठी आल्या आहेत. झी मराठीने हा प्रोमो शेअर करत लिहिलंय, “माहेरची साडी घेऊन अलका ताई येणार गोपाळ टेलरच्या दारी. अलका कुबल ‘देवमाणूस’ मालिकेत खरोखर प्रवेश होणार का? याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अलका कुबलची झलक ही केवळ प्रोमोशन्साठी आहे की पुढे काही मोठं सरप्राईज दडलेलं आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
तेव्हा पाहायला विसरू नका देवमाणूस – मधला अध्याय २ जूनपासून दररोज रात्री १०:०० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.