मुंबई: भारतातील समकालीन ऑटोमोटिव वारशाच्या सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक, मॉडर्न क्लासिक रॅली आता अधिक विस्तृत स्वरूपात आणि जास्त क्लासिक कार्ससह परत येत आहे. ऑटोकॉर इंडियाद्वारे आयोजित हा इव्हेंट आता दोन दिवस १ आणि २ मार्च २०२५ ला मुंबईमध्ये ग्रँड हयात येथे सकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
कार प्रेमींना ७० ते ९० च्या दशकातील ८० हून अधिक प्रतिष्ठित मॉडर्न क्लासिक्स जवळून पाहण्याची संधी मिळाली. रेअर परफॉर्मन्स जेडीएम्सपासून (JDMs) ते क्लासिक इटालियन मास्टरपीसपर्यंत अनेक प्रसिद्ध ब्रँड्सच्या कार्सचे अनोखे कलेक्शन येथे प्रदर्शित केले गेले. १९७० ते २००० च्या दशकातील प्रतिष्ठित मॉडर्न क्लासिक कार्सच्या विशेष प्रदर्शनात, पॉर्शे, मासेराती, फेरारी, लॅम्बॉर्गिनी, मर्सिडीज-बेंझ, ऑडी, बीएमडब्ल्यू, डॉज, लँड रोव्हर, जग्वार, एक्यूरा आणि अन्य प्रसिद्ध ब्रँड्सच्या अप्रतिम गाड्या दिसल्या.
याशिवाय, कार्सचे मालक आणि कलेक्टर्स यांच्याशी खास संवाद, ऐतिहासिक ऑटोमोटिव मॉडेल्स पाहण्याचा दुर्मिळ अनुभव आणि नव्या पिढीच्या कार प्रेमींना प्रेरित करणाऱ्या अनेक गोष्टी या इव्हेंटच्या मुख्य आकर्षणांपैकी होत्या.
गेल्या एका दशकात, मॉडर्न क्लासिक्सने कलेक्टर्सच्या जगात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कार्स एनालॉग चार्म आणि आधुनिक अभियांत्रिकीच्या संयोगाचे प्रतीक आहेत आणि ते आजही कार प्रेमींना आकर्षित करतात. ग्रँड टूररच्या प्रतिष्ठित डिझाईनपासून, स्पोर्ट्स कूपेच्या तांत्रिक शुद्धतेपर्यंत आणि परफॉर्मन्स सेडानच्या दमदार कॅरेक्टरपर्यंत – मॉडर्न क्लासिक्स हे खरे ड्रायव्हिंग पॅशन दर्शवतात.