‘टायगरमुळे आम्हाला रिटेक ही नाही घ्यावा लागला…’- वल्लरी विराज

मुंबई:’नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे आणि लीलाची पहिली मकरसंक्रांत साजरी होत आहे. त्या आधी एजेने, लीलासाठी खास पाणीपुरी तयार केली होती. एजे लिला सोबत एका खास ठिकाणी आहे जिथे एजेची मन्याशी पहिल्यांदा भेट होते. मन्या अनपेक्षितपणे एजेच्या घरी येतो, ज्यामुळे एजे थक्क होतो. मन्याने दिलेली आईस्क्रीम लीला खात आहे, पण त्यामागील त्याच्या खऱ्या हेतूंची तिला कल्पना नाहीये. लिला आजारी असताना एजे तिची काळजी घेतोय, तिच्यासाठी मकरसंक्रांतसाठी हलव्याचे दागिने स्वतः बनवतोय. एजेच्या काळजीने लीला भावूक होते, पण लीलाची अपेक्षा आहे की एजे आपले मन मोकळं करेल. मकरसंक्रांती निमित्ताने मालिकेत पतंग स्पर्धा रंगणार आहे. हा सीन बद्दल शूट करताना लीला म्हणजेच वल्लरी विराजने काही सीन मागचे किस्से सांगितले, ‘या स्पर्धेत मी आणि एजे वेगळ्या टीम मध्ये होतो. सीन शूट केला तेव्हा खूप मज्जा केली. आम्ही सगळ्यांनी मिळून डांस केला, सगळे काळ्या कपड्यांमध्ये होतो, हलव्याचे दागिने घालून फोटोशूट केलं. हळदी- कुंकू केलं आणि मी एजे एक खास शेफ कॅप बनवली ज्यात हलव्याचे दागिने लावले होते. आम्ही तीळगूळ वाटले एक्दम मस्त वातावरण होते सेटवर. मकरसंक्रांत सीन मध्ये आमच्या घरचा खास सदस्य म्हणजे टायगर ही सामील झाला होता. तसं त्याच खरं नाव शेरू आहे, तो खूप गुणी कुत्रा आहे. आम्ही जेव्हा फोटोस घेते होतो तेव्हा तो माझ्या बाजूला येऊन बसला आणि तो इतकं सहकार्य करतो कि त्याच्यामुळे आम्हाला एक ही रिटेक घ्यावा लागला नाही. त्यांनी पटापट आपले शॉट्स दिले. एकदम उत्साहात आमचा मकरसंक्रांत सण साजरा झाला. हे भाग प्रेक्षकांना प्रेक्षकांना पाहायला नक्की मज्जा येणार आहे.”

तेव्हा बघायला विसरू नका ‘नवरी मिळे हिटलरला’ दररोज रात्री १०:०० वा फक्त आपल्या झी मराठीवर.