हेमंत पाटील यांना’भारत गौरव पुरस्कार’जाहीर

मुंबई:इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गेली अनेक वर्ष भ्रष्टाचार विरोधात दिलेल्या लढ्याची दाखल घेत दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स संस्थेतर्फे त्यांना ‘भारत गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. येत्या २४ जून २०२४ ला दुबई येथील मिलेनियम प्लाझा येथे होणाऱ्या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

गेली अनेक वर्ष इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील हे भ्रष्टाचार विरोधात काम करत आहे. ११ वी, १३ वी प्रवेश प्रक्रियेत होणारा घोटाळा उघड करीत अनेक वर्ष न्यायालयीन लढा देत त्यांनी ११ वी, १२ वी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने घेण्यास सरकारला भाग पाडले. त्यामुळे आज गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील कायदेशीर मार्गाने प्रवेश घेणे शक्य झाले. इतकेच नव्हे तर तात्कालिन कॉँग्रेस नेते आणि आताचे भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा बाहेर काढण्यात देखील इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांना मोठा सहभाग होता.

देशातील अनेक मोठमोठे भ्रष्टाचार त्यांनी उघड केले असून देशातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना एकत्र करून त्यांनी संघटन कौशल्य सुद्धा वाढवलेले आहे. प्रत्येक राज्यात त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरोधी काम चालू आहे. पुढील काळामध्ये लोक चळवळ उभी करून देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल; तसेच देशातील भ्रष्टाचार कमी करण्याच्या या चळवळीला केंद्र सरकारच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल, अशा भावना हेमंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.