ऑडी क्यू३ आणि ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकच्या स्थानिक उत्पादनाला सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : ऑडी इंडियाने ऑडी क्यू३ आणि ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकच्या स्थानिक उत्पादनाला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल प्लांटमध्ये सुरुवात केली आहे. यासोबतच व्हीडब्ल्यू ग्रुपने मेक इन इंडियाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत भारतीय लक्झरी ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादन ऑफरचा विस्तार करणे सुरु ठेवले आहे.