बीसीएएसद्वारे मुंबईमध्‍ये पहिल्‍यांदाच सीए मॅरेथॉनचे आयोजन

मुंबई: बॉम्‍बे चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्स सोसायटीने (Bombay Chartered Accountants’ Society (BCAS) आयोजित केलेल्‍या सी-थॉन (CA-THON) रनच्‍या पहिल्‍या एडिशनचे २२ डिसेंबर २०२४ ला मुंबईमध्‍ये आयोजन करण्यात आले. जिथे संपूर्ण शहरातून आणि शहराबाहेरून १८ ते ७० वर्ष वयोगटातील १ हजार ६०० हून अधिक जण सहभागी झाले होते. ना-नफा तत्त्वावर आधारित उपक्रम सीए-थॉनचा आरोग्‍य आणि फिटनेसबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍याचा तसेच आर्थिक स्‍वावलंबीत्व, नैतिक व्‍यवसाय पद्धती आणि समुदाय सहभागाला चालना देण्‍याच्‍या बीसीएएसच्‍या समान मूल्‍यांशी संलग्‍न राहण्‍याचा होता. तसेच बीसीएएस फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून समुदाय सहाय्य उपक्रमाने वंचित महिलांना त्‍यांच्‍या उदरनिर्वाहाला पाठिंबा देण्‍यासाठी आणि आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी करण्‍यासाठी शिलाई मशिन्‍स देऊ केल्‍या.

भारतातील चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्सची सर्वात मोठी व सर्वात जुनी स्‍वयंसेवी व्‍यावसायिक संस्‍था बॉम्‍बे चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्स सोसायटी (बीसीएएस) चार्टर्ड अकाऊंटण्‍सी क्षेत्रात शिक्षण, नेटवर्किंग आणि सर्वोत्तमता या मूल्‍यांना चालना देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. १९४९ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली बीसीएएस भारतातील ३५० हून अधिक शहरे व नगरांमध्‍ये कार्यरत आहे आणि सर्वोत्तम नियामक धोरणे व शासनाला समर्थन देण्‍यामध्‍ये प्रमुख भूमिका बजावते. बीसीएएसने नुकतेच व्‍यवसाय व व्‍यापक समुदायाप्रती उल्‍लेखनीय योगदानांच्‍या ७५ वर्षांनिमित्त अमृत महोत्‍सव साजरा केला.

बीसीएएसचे अध्‍यक्ष सीए आनंद भाटिया म्‍हणाले, ‘२०२४ बीसीएएससाठी ७५वे सेलिब्रेटरी वर्ष असल्‍याने ऐतिहासिक वर्ष ठरले आहे. पहिल्‍यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्‍या सीए-थॉनसह वर्षाची सांगता उत्‍साहवर्धक झाली आहे, जिथे देशाच्‍या कानाकोपऱ्यामधून आणि विविध वयोगटांमधील १६०० हून अधिक रनर्सचा सहभाग दिसण्‍यात आला. रनिंगसह सीए-थॉनने व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आणि आमच्‍या समुदायामध्‍ये लहान बदल घडवून आणण्‍यासाठी ‘रनिंग फॉर ए कॉज’ तत्त्व अंगिकारले. यासारखे इव्‍हेण्‍ट्स चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्सच्‍या सर्वांगीण विकासाप्रती योगदान देण्‍याच्‍या आणि परिसंस्‍थेमध्‍ये मोठ्या उद्देशाला चालना देण्‍याच्‍या आमच्‍या मिशनला अधिक दृढ करतात.’

बॉम्‍बे चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्स सोसायटी (बीसीएएस) (Bombay Chartered Accountants’ Society (BCAS)) भारतातील चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्सची सर्वात मोठी व सर्वात जुनी स्‍वयंसेवी व्‍यावसायिक संस्‍था असून बीसीएएसचे सदस्‍यांना बहुआयामी दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून विकास व प्रगतीसाठी व्‍यापक संधी देत व्‍यावसायिकांचा विकास करण्याचे मुलभूत मिशन आहे. या मिशनमध्‍ये लर्निंग इव्‍हेण्‍ट्स, संशोधन प्रकाशन, समर्थन, नेटवर्किंग आणि सामुदायिक उपक्रमांचा समावेश आहे. ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍था बीसीएएस शेकडो स्‍वयंसेवकांच्‍या समर्पित प्रयत्‍नांवर अवलंबून आहे, जे नि:स्‍वार्थपणे त्‍यांचा वेळ व कौशल्‍य देतात, तसेच सामायिक मूल्‍ये व व्‍यावसायिक नैतिकतेचे पालन करतात. अग्रगण्‍य विचारसरणी-प्रमुख व समुदाय सक्षमकर्ता बीसीएएस भारतातील अकाऊंटिंग, कर, फायनान्‍स आणि आर्थिक क्षेत्र प्रबळ करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बीसीएएस सेमिनार्स, वर्कशॉप्‍स, रिफ्रेशर कोर्सेस व स्‍टडी सर्कल्स असे विविध लर्निंग इव्‍हेण्‍ट्स आयोजित करत आपल्‍या सदस्‍यांच्‍या व्‍यावसायिक विकासाला चालना देते, तसेच त्‍यांना त्‍यांची कौशल्‍ये निपुण करण्‍यास आणि उद्योग ट्रेण्‍ड्सबाबत अपडेटेड राहण्‍यास प्‍लॅटफॉर्म देते. बीसीएएसचा संशोधन प्रकाशनांमध्‍ये अपवादात्‍मक ट्रॅक रेकॉर्ड आहे, जे प्रामुख्‍याने बीसीए जर्नलमध्‍ये (बीसीएजे) दिसून आले आहे. बीसीएजे पाच दशकांहून अधिक काळ प्रकाशनासह लोकप्रिय मासिक नियतकालिक आहे. बीसीएएसच्‍या राष्‍ट्रनिर्मितीप्रती व्‍यापक उपक्रमाला नियामक व सरकारी अधिकाऱ्यांप्रती त्‍यांच्‍या व्‍यापक प्रतिनिधीत्‍वाचे पाठबळ आहे. बीसीएएसचा व्‍यावसायिक विकासाप्रती सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे, तसेच त्‍यांचे समुदाय-केंद्रित उपक्रम अधिक प्रबळ व शाश्‍वत भविष्‍याला सक्षम करत आहेत.