विद्यानिधी मराठी माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी उत्सव साजरा!

मुंबई:विद्यानिधी मराठी माध्यमिक विद्यालयात या शैक्षणिक वर्षातील सर्वात मोठा सण आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट टियाराचे सदस्य अध्यक्षा कुंती मॅडम, माजी सदस्या अल्पा मॅडम, सदस्या सोनल मॅडम उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता १०वी अ च्या विद्यार्थ्यांनी परिपाठाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण रक्षणाचा नवीन प्रकार बियाणी गोळे (seed ball)हे देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले

कुमार विराज याने सादर केलेल्या कीर्तनाने, तसेच उत्कृष्ट नृत्याने आणि सुरेल भक्तिगीतांनी कार्यक्रम रंगला. प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि शिक्षकांचा उत्साह पाहून भारावून गेले.

कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे भाषिक मंडळाचे उद्घाटन. यावेळी मास्टर शुभम कोळेकर याने ‘मन में है विश्वास’ या विश्वास नांगरे पाटील यांच्या पुस्तकाचे पहिले परिक्षण सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी विठुरायाच्या पालखीची प्रार्थना करण्यात आली आणि एक छोटीशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी पारंपारिक लेझीम नृत्य सादर करून पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा दिल्या.