केंद्र सरकारचा तन्वी बोडेरेला पुरस्कार !

मुंबई: जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्रजलाल पारेख मराठी माध्यमाच्या इयत्ता ८ वीतील तन्वी बोडेरेला नुकताच शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य स्पर्धेत नागपूर येथे नुकताच उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळाला. तन्वी बोडेरेने “सेफ्टी मॅचबॉक्स” नावाचा एक छोटा प्रोटोटाइप विकसित केला आहे, ज्यामध्ये प्रचलित वापरातील आगकाडीमुळे होणारे अपघात टाळता येतील अशी संपूर्ण जळणारी आगकाडी बनविली आहे. तन्वीच्या शिक्षिका कांचन पिंगळे यांनी तिच्या या कल्पनेला प्रोत्साहन दिले आणि त्यासाठी भारतीय केंद्र शासनाकडून इन्सपायर मानक पारितोषिकाबद्दल प्रशस्तीपत्र व संशोधनासाठी पुरस्कार ₹ १०,०००/- मिळाला आहे. या पुरस्कारामुळे तन्वीच्या कल्पनेला उपयोगी डिजाइनमध्ये विकसित करण्यास मदत होणार आहे.