देवदत्त पाठक यांच्या गुरुस्कूल गुफांनचा कुमार रंगकर्मी पुरस्कार प्रदान

पुणे: जुलै महिन्यात सुरू झालेल्या शाळेच्या अभ्यासक्रमात नाटकाचा तास या प्रकल्पांतर्गत १२०तासांच्या संकल्पित अभ्यासक्रमाच्या निमित्ताने दिला जाणारा कुमार रंगकर्मी पुरस्कार रोटरी क्लब सदाशिव पेठ आणि पाषाणचे देवदत्त हंबर्डीकर आणि प्राजक्ता जेरे यांच्यासह प्रा.देवदत्त पाठक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराची विशेष लक्षणे ,वर्तनातील तंदुरुस्ती, कलात्मक अभिव्यक्ती आणि सहकार्य पूर्ण व्यक्तिमत्व अशी आहे. यावर्षीचा पुरस्कार किरकट वाडी पुणे,या गावातील नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या ज्ञानदा प्रशालाचे विद्यार्थी सार्थक नेमटे आणि अपेक्षा बामगुडे यां सातवीतील विद्यार्थ्यांना देण्यात आला .

२०२५ – २६ वर्षासाठी सातवीच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लबचे सहकार्य नाटकाचा तास घेण्यास लाभले. प्रा.देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी वर्षातील शाळांच्या मध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांची निवड केली. प्रशिक्षण, परीक्षा, प्रयोग स्पर्धा स्वरूपामध्ये हा नाटकाचा तास घेण्यात आला. या निमित्ताने प्रसाद कुंभोजकर, बाळकृष्ण मावळे दिपाली पानसे , संपदा गायकवाड,गायत्री वर्तक यांची विशेष उपस्थिती होती
रंगभूमी कला गावात पोहोचावी व यामुळे मुलांचा आत्मविश्वास आणि कलात्मक सहभाग वाढावा यासाठी आणि देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकरयांच्या माध्यमातून गुरुस्कूल निफाडच्या वतीने पुरस्कार देण्याचे कार्य होत आहे.व्यक्तिमत्व विकसन आणि क्षमता विकासासाठी पुरस्कार पुरस्कर दिला जातो.

नाटकाचा तास ही संकल्पना अत्यंत नाविन्यपूर्ण असून या निमित्ताने मुलांचं मन बुद्ध बुद्धी आणि शरीर हे क्रियाशील व्हायला मदत होते हे त्यांच्या वागण्यातून जाणवते असे प्राजक्ता जेरे म्हणाल्या. तर देवदत्त हंबर्डीकर यांनी तळागाळापर्यंत मुलांच्या क्षमता विकासासाठी नाटकाचा दास उपयुक्त होतोय याचा आम्हाला आनंद आहे असे मत व्यक्त केले. तर प्रा. देवदत्त पाठक यांनी शिक्षक , शैक्षणिक प्रशासन ,राज्य शासन यांच्यातली नाटकाच्या तासामुळे प्रत्यक्ष कृतीमधील आत्मीयता निर्माण होते आहे ही नाटकाच्या तासाबद्दलची फलश्रुती आहे असे प्रतिपादन केले.

यावर्षी मुलांनी प्रशिक्षणाबरोबर ‘हात धरा दे हात धरा’ हे देवदत्त पाठक लिखित आणि दीपक परदेशी आणि मिलिंद केळकर दिग्दर्शित नाटकही समारोपाच्या निमित्ताने सादर केले. या निमित्ताने या सर्व मुलांना गुणवत्ता प्रमाणपत्र ही देण्यात आले. बाळकृष्ण मावळे, प्रसाद कुंभोजकर,संपदा गायकवाड दिपाली पानसे, गायत्री वर्तक याप्रसंगी उपस्थित होते.