दिवाळी पहाट नाटकाची…

देवदत्त पाठक
रंगभूमी कला तज्ञ

पूर्वीपासून आजपर्यंत दिवाळी पहाटेला लवकर उठून अत्तर उटण्याने आंघोळ करून ,औक्षण होऊन आणि फटाके उडूवून , नवीन कपडे घालून, दिवाळी साजरी केली जाते .पण आता दिवाळी पहाटची संकल्पना छोट्या मुलांसाठी मित्रांसाठी फार वेगळी होऊन गेली आहे. आता शाळा शाळांमध्ये चक्क लहान मुलांना पहाटे पाच वाजता बोलवून शाळेच्या दारात मुलांचेऔक्षण करून त्यांच्यासाठी खास फराळाच्या मेजवानी बरोबर, नाटकाची पण मेजवानी सुरू झाली आहे .

हो,सकाळी सकाळी मुलांनी त्यांच्या अनुभवा विश्वातलं छानसं नाटक बघायचं आणि त्यांची दिवाळी आनंदात साजरी करायची. दिवाळी पहाट नाटकाची असं म्हणूया याला, शाळेच्या बाहेर छान रंगबिरंगी घातलेल्या रांगोळ्या, फुलांची सजावट दिव्यांची रोषणाई ,आकाश कंदील आणि मुलांची रोजची जाण्या येण्याची शाळेची वाट छानशा मंद उदबत्तीने सुगंधित केली जाते,प्रत्येक मुलाला शाळेतल्या शिक्षिका औक्षण करतात,त्यांच्या डोक्यावर अक्षता पडतात आणि मग लाडवाचा किंवा एखाद्या शंकरपाळ्याचा गोड खास त्यांच्या तोंडात जातो, ही अत्यंत आनंददायक मनाला प्रसन्न करणारी अशी अनुभूती मुलांच्या वाट्याला शाळांमधून येऊ लागलीय .त्याच्या जोडीला मग मुलं हॉलमध्ये येऊन बसतात आणि त्यांच्यासमोर सुरू होतं एक छानसं नाटक,प्राध्यापक देवदत्त पाठक लिखित आणि दिग्दर्शित पहिली ते चौथी ऍक्टर व्हायचे तुला, अभ्यासाच्या नावानं, अशा एक नाही दोन नाही तीन नाटकांच्या प्रयोगांची धमाल मुलांना त्यांच्या त्यांच्या शाळेत दिवाळीच्या पहाटेलाच सकाळी सकाळी अनुभवायला मिळते. आनंदाच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत मुलांचे शाळांबद्दलचे प्रेम वाढावं,शाळेत यावसं वाटावं, शाळेमध्ये फक्त अभ्यास न करता वेगवेगळ्या आनंददायी अनोख्या तुडुंब कार्यक्रमाने मुलांचं मन रमावं, यासाठी ही संकल्पना देवदत्त पाठक गेली १०वर्ष राबवत आहेत,अनेक शाळांमधून त्यांनी अशा प्रकारचं दिवाळी पहाटेलाच नाटक दाखवण्याचं प्रयोजनही ठरवून घेतले आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या गुरु स्कूलचे विद्यार्थी सहभागी आहेत ,अर्णव देशपांडे ,मल्हार बनसुडे धनश्री गवस गौरी पत्की, गौरी बनसोडे इत्यादी छोट्या-मोठ्या विद्यार्थी कलाकारांकडून हे नाट्यप्रयोग शाळांमध्ये होत आहेत आणि त्याचा फार मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मोजकच नेपथ्य आणि मोजकेच लाइट्स याच्या सहाय्याने विषय मात्र एकदम भारी ,जणू काही शालेय जीवनातमध्ये वापरायच्या वस्तू त्यांच्या कवितांचं नाटक,पालकांचा मुलांनी ॲक्टर बनण्याचा अट्टाहास नी अतिरेक आणि अभ्यासाच्या नावानं मुलं काय धिंगाणा घालतात अशा वेगवेगळ्या विषयांचा असलेला नाट्यविष्कार मुलांना हसवतो ही आणि अंतर्मुखही करतो. जोडीला मस्त ,संगीत ,नृत्य आणि गाणंही उषा देशपांडे, ऋतुजा केळकर हे असतात सूत्रधार आणि मिलिंद केळकर अक्षय खामकर, गणेश भोसले असतात याचे निर्मिती प्रमुख. लेखन, दिग्दर्शन देवदत्त पाठक यांचेआणि त्यांना प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मिलिंद केळकर मदतही करतात .

काही काळ का होईना मुलं एका सजीव जिवंत अनुभवामध्ये रमून जातात. आणि नवनवीन त्यांच्याच अनुभव विश्वातले विषय यामुळे समजूतदार बनतात आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, चांगलं काय ? वाईट काय? हे कसं समजून घ्यायचं त्यासाठी नाट्यकला उपयोग पडू शकते असं बाल कुमार रंगभूमी तज्ञ देवदत्त पाठक म्हणतात. म्हणूनच दिवाळी पहाट नाटकाचं महत्त्व एका वेगळ्या अर्थाने महत्त्वाचं ठरतं दिवाळी सारख्या मंगलमय सणामध्ये नात्यांची वीण घट्ट व्हावी ,भावनांना प्राधान्य द्यावं ,आणि योग्य त्या गोष्टीसाठी संवेदनशील व्हावं, याची सुरुवात दिवाळी पहाट या नाटकाच्या प्रयोगातून होते.अशा प्रकारचे प्रयोग नित्यनेमाने गेली दहा वर्ष करणारे प्रा. देवदत्त पाठक आणि त्यांचे गुरु स्कूल हे अनोख्या उपक्रमाबाबत जागृत आहेत आणि त्याचा दरवर्षी पाठपुरावाही करतात.