मुंबई : इझमायट्रिपडॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक पोर्टलने भारतातील प्रवाशांना प्रवासी तिकिटांची, तसेच इतर उत्पादन व सेवांची विक्री, प्रसार आणि विपणन करण्यासाठी स्पाइसजेट एअरलाइनसोबत जनरल सेल्स अॅग्रीमेंटवर (जीएसए) स्वाक्षरी केली आहे.
इझमायट्रिपने धोरणात्मक हस्तक्षेप म्हणून स्पाइसजेटसोबत व्यवस्थापन करण्याकरिता सहयोग केला आहे. दोन्ही कंपन्यांचा भारतीय बाजारपेठेत आपल्याह सेवांचा विस्तार करण्याप्रती हा प्रयत्न आहे. हा जीएसए करार १ ऑगस्ट २०२३ पासून अमलात येईल. या करारांतर्गत इझमायट्रिपवर भारतात स्पाइसजेटने प्रदान केलेली उत्पादने, सेवांची विक्री आणि प्रसार करण्याची जबाबदारी असेल. यामुळे ग्राहकांना स्पाइससेटच्या सेवांचा लाभ घेता येईल.
इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले, ‘आम्हाला स्पाइसजेटसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे आणि अतिरिक्त गती मिळण्यासोबत पुढील १८ ते २४ महिन्यांमध्ये विमान तिकिटिंग उद्योगामध्ये अग्रणी बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची अपेक्षा आहे. हा सहयोग आणि भावी संपादनांसाठी क्षमतेसह आम्हाला विकासासाठी उत्तम संधी मिळाली आहे. आम्ही आगामी या उत्साहवर्धक क्षमतांची आतुरतेने वाट पाहत आहोत, तसेच आम्ही स्पाइसजेटसोबतचा सहयोग अधिक दृढ करू.’
स्पाइसजेटच्या चीफ कमर्शियल ऑफिसर शिल्पा भाटिया म्हणाल्या, ‘मला भारतातील स्पाइसजेटचे जनरल सेल्स एजंट म्हणून इझमायट्रिपच्या नियुक्तीची घोषणा करताना आनंद होत आहे. त्यांचा व्यापक अनुभव, प्रबळ उद्योग संबंध आणि भारतीय बाजारपेठेबाबत असलेल्या सखोल माहितीसह आम्हाला विश्वास आहे की, ते आमच्या विक्री प्रयत्नांना नव्या उंचीवर घेऊन जातील. आम्ही यशस्वी सहयोगाकरिता उत्सुक आहोत, ज्यामुळे आमचा ब्रॅण्ड आणि ग्राहक अनुभवामध्ये अधिक वाढ होईल.’
इझमायट्रिपच्या ट्रॅव्हल उद्योगामधील व्यापक नेटवर्कसह कंपनी स्पाइससेटच्या विक्रीला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. जीएसएनुसार इझमायट्रिप आपल्या वितरण माध्यमांचा सक्रियपणे फायदा घेईल आणि स्पाइसजेटचे वितरण व नेटवर्क वाढवण्याकरिता सर्व आवश्यक उपाययोजना राबवेल.