मुंबई : करिअर-टेक व्यासपीठ इंटर्नशालाने आपला वार्षिक उपक्रम ग्रॅण्ड समर इंटर्नशिप फेअर (जीएसआयएफ-२०२३) लाँच केला आहे. हा उपक्रम शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांसाठी २३,००० हून अधिक समर इंटर्नशिप संधी घेऊन येत आहे. इच्छुक उमेदवार २ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल २०२३ दरम्यान इंटर्नशालाच्या संकेतस्थळाला भेट देऊन या संधींसाठी अर्ज करू शकतात.
जीएसआयएफ-२०२३ मध्ये २,८०० हून अधिक कंपन्या विविध प्रोफाइल्ससाठी समर इंटर्न्स नियुक्त करणार आहेत. एअरटेल, डेकॅथलॉन, डन्झो, स्नॅपडील, टॉमी हिलफिगर, आयआयटी बॉम्बे, नो ब्रोकर, कल्टफिट, लावी, कॅरेटलेन, टाइम्स इंटरनेट, एसबीआय फंड्स मॅनेजमेंट, बॅगझोन लाइफस्टाइल, लेमन ट्री हॉटेल्स आणि क्लीअरटॅक्स यांसारखे अनेक लोकप्रिय ब्रॅण्ड्स ग्रॅण्ड समर इंटर्नशिप फेअरमध्ये सहभागी होत आहेत.
या उपक्रमाचा भाग म्हणून सर्व शैक्षणिक पार्श्वभूमींमधील महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना अनेक इंटर्नशिप्स ऑफर केल्या जात आहेत. तसेच जीएसआयएफ-२०२३ अंतर्गत सर्व इंटर्नशिप्स निश्चित स्टायपेंडसह (वेतन) येतात. हे इच्छुक विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी सुरक्षित करण्यासाठी आणि दरमहा ६५,००० रूपये इतके उच्च वेतन मिळविण्यासाठी व्यासपीठ प्रदान करते.
इंटर्नशालाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वेश अग्रवाल म्हणाले, ‘आमचा वार्षिक उपक्रम ग्रॅण्ड समर इंटर्नशिप फेअर – २०२३ लाँच करण्याचा आम्हाला आनंद होत आहे. वर्षभर विद्यार्थी इंटर्नशिप्सचा लाभ घेत असताना समर हा इंटर्नशिप्स करण्याचा अजूनही सर्वोच्च सीझन आहे. विद्यार्थ्यांमधील समर इंटर्नशिप्सप्रती या मागणीची पूर्तता करण्यासाठी जीएसआयएफ २३,००० हून अधिक इंटर्नशिप्स घेऊन येत आहे, ज्यामध्ये मोठ्या ब्रॅण्ड इंटर्नशिप्स, वर्क-फ्रॉम-होम, शॉर्ट-टर्म, पार्ट-टाइम, इन-ऑफिस आणि पीपीओ इंटर्नशिप्स ऑफर करण्यात येत आहेत.’