श्रीराम आयएएसची अनअकॅडमीसह भागीदारी

मुंबई:भारतातील सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आणि श्रीराम आयएएस अकॅडमी या ३५ वर्ष जुन्या ऑफलाइन कोचिंग संस्थेने आज लाखो युपीएससी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या हेतूने भागीदारी केल्याचे जाहीर केले. या भागीदारीअंतर्गत श्रीराम आयएएस आणि अनअकॅडमी एकत्रितपणे त्यांची शिक्षणपद्धती, शिक्षक, ऑनलाइन तंत्रज्ञान, तज्ज्ञ इत्यादीच्या मदतीने प्रशासकीय सेवा परीक्षांची तयारी करत असलेल्या उमेदवारांना सर्वोत्तम शिक्षण देईल.

श्रीराम आयएएस आणि अनअकॅडमीद्वारे युपीएससीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार कंटेंट, शिक्षणाच्या अत्याधुनिक पद्धती आणि अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरील अनुभवी शिक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या भागीदारीचा एक भाग म्हणून श्रीराम आयएएसचे काही सर्वोत्तम शिक्षक अनअकॅडमीच्या शिक्षकांबरोबर अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या प्रसिद्ध शिक्षणपद्धतींचे ज्ञान देतील. गेल्या ३५ वर्षांपासून ३० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव असलेले श्रीराम आयएएसचे संस्थापक आणि संचालक श्रीराम श्रीरंगम यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम आयएएसच्या काही शिक्षकांची टीम यामध्ये सहभागी होईल. श्रीराम आयएएसचे ऑनलाइन अभ्यासक्रम खास अनअकॅडमीवर उपलब्ध असतील.

अनअकॅडमीच्या ऑनलाइन फ्रेमवर्कच्या मदतीने सर्व उमेदवारांना त्यांचे तंत्रज्ञान वापरता येईल तसेच अभ्यास साहित्य आणि स्त्रोतांचा अमर्यादित लाभ घेता येईल. याला श्रीराम आयएएसच्या परीक्षेनुसार क्लासरूम कोचिंगची जोड दिली जाईल. उमेदवारांना आगामी शैक्षणिक वर्षासाठी १० एप्रिलपासून सुरू होत असलेल्या नव्या बॅचमध्ये प्रवेश घेता येईल.

श्रीराम आयएएसचे संस्थापक आणि संचालक श्रीराम श्रीरंगम म्हणाले, ‘श्रीराम आयएएस आणि अनअकॅडमी यांच्यातील भागीदारी इंग्रजी माध्यमाच्या प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचणार आहे. आमच्यात अनुभव, क्षमता, तंत्रज्ञान आणि व्याप्ती आहे. या संयुक्त भागीदारीमुळे उमेदवारांना हे शिक्षण वाजवी किंमतीत उपलब्ध होणार आहे, ही सर्वात महत्त्वाची बाब असून त्यामुळे बऱ्याच काळापासून अस्तित्वात असलेली दरी सांधली जाईल.’