पुणे : जागतिक रंगभूमी दिन २७ मार्च पुण्यात साजरा करण्यात आला.गुरूस्कूल गुफान पुणे आयोजित जागतिक रंगभूमी दिनी सहभागी युवा रंगकर्मीचे मत प्रा. देवदत्त पाठक यांनी सृजनशील असणे हे मानसिक स्थैर्याचे लक्षण आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नाट्यकलेद्वारे होणारा कल्पनेचा विस्फोटाच्या प्रक्रियेतील अनुभव प्रत्येकाला आनंदी जगण्याची उर्मी देतो,असे नाट्य शाळेतून उपस्थित रंगकर्मींना खुलवत रुजवात केली. आयत्या वेळचे नाटकच्या प्रा.देवदत्त पाठक यांच्या नाटयकार्यशाळेत युवा रंगकर्मींनी ‘नाटक सांभाळ करी’याचे नाट्य सादरीकरणही केले.
२९७ देशांतून नाट्य संदेशासाठी IAPAR च्या वतीने निवडून सन्मान मिळालेल्या सिमोह अयुब या इजिप्शियन अभिनेत्रीच्या नाट्य संदेशाचे वाचन नाट्य प्रशिक्षक मिलींद केळकर यांनी केले. नाटयसंदेशात समिहा अयुब (इजिप्त)यांनी ‘वेगवेगळे समूह आज स्वतःच्या विचारांनी जगताना नाटक मात्र अंतर्यामी हरवत चाललेल्या संवेदना जागृत करून, मानवी मनातील दलदल, नष्ट करून, स्वातंत्र्य, सहिष्णुता, प्रेम यांची जाणिव करून देते, असे विचार त्यांनी मांडले.
समाज आरोग्य तज्ज्ञ डॉ.नितीन जाधव यांनी प्रा.देवदत्त पाठक यांची मनाच्या मशागतीसाठी बाल, कुमार, किशोर आणि युवा (बा.कु कि.यु.) रंगभूमी या कलासंकल्पनेवर आधारित प्रकट मुलाखत घेतल. त्यांनी रंगमंचीय खेळांतून युवा रंगकर्मींच्या मन आरोग्यासाठी यावेळी रंगमंचीय खेळ घेतले.
रंगभूमी कला तुमचे मन, बुध्दी, शरीराचा समतोल सांभाळते, त्यासाठी प्रत्येक शाळेतूनच याचे अभ्यासक्रमीय बाळकडू सर्वांना मिळायला हवे, अशी भावना युवा रंगकर्मी राहुल नगरकर, सागर चव्हाण, कृष्णा मोरे,आलोक जोगदनकर, सतिश रहाणे ,तनया जाधव यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे, कल्पना शेरे, मीना खाडे ,सीमा जोगदनकर,चिदानंद जोगदनकर, निलेश शिंदे यावेळी उपस्थित होते.