मुंबई : नव्या बोरिवली कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘सृजन’ ने एक मिशन सुरू केलं. त्यात लोग साथ आते गये..कारवा बनता गया… आणि सृजनात्मक अविष्काराचा सेतू बांधला जाऊ लागला. ‘सृजन’ने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या निमित्ताने सुरु झालेली चळवळ आता अनेकांच्या प्रेमाशिर्वादाने वाढत जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले. नवोदितकलाकारांना अनुभवी कलाकारांचे योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने सुरु झालेल्या ‘सृजन’ च्या चळवळीला आता ३ वर्ष पूर्ण होतायेत.‘सृजन द क्रिएशन’ च्या तिसऱ्यावर्धापन दिनाचे औचित्य साधून १३ ते १५ मे दरम्यान ‘सृजनद क्रिएशन’ तर्फे ‘ सृजनोत्सव २०२३’ हा भव्य एकांकिका महोत्सव रंगणार आहे. सकाळी ११ ते रात्री १० सृजनच्या कलाकारांच्या एकपात्री, नृत्य गाणं स्किट, कविता वाचन विविध कलाकृती सादर होणार आहेत.
ॲक्टिव्हिटी सेंटर, श्रीकृष्णनगर, पूर्व येथे.. हा ‘सृजनोत्सव२०२३’ रंगणार आहे. म्ह्या, मेन इन ब्लॅक, झुला, हेल्पलेस, रूममेट, हे गेले अशा विविध एकांकिकांचा आस्वाद या महोत्सवात घेता येणार आहे. विजय तेंडुलकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘मित्राची गोष्ट’ हे दोन अंकी नाटकही सृजन क्रिएशनतर्फे सादर होणार आहे. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
तीन वर्षात ‘सृजन द क्रिएशन’ने जवळपास २५ एकांकिका, ३० शॉर्ट फिल्म्स,दीर्घांक, दोन दोन अंकी नाटकं,अनेक स्किट्स, अभिजात नाटकांची अभिवाचने केली..या पुढेही ही चळवळ अशीच सुरू राहणार..असून या आनंदात सहभागी होण्याचे आवाहन लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी केले आहे. वय वर्ष ७ ते ७० या वयोगटातली लोकं इथं एकत्र येऊन अनेक ॲक्टिव्हिटी सोबत एकमेकांच्या वैयक्तिक कौटुंबिक सुखदुःखात सामील होत आहेत. अनेकमान्यवरांनी ‘हातचं काही राखून न ठेवता’ त्यांना मार्गदर्शन केलं, करीत आहेत.