मुंबई:भारतात कॉर्नियासंबंधी अंधत्व वाढत चालले आहे. देशात दरवर्षी अंदाजे २० हजार ते २५ हजार नवीन रुग्ण आढळतात. देशात दृष्टी अधू होण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरते आहे. एकूण अंधत्व सुमारे ७.५% आहे. कॉर्नियाविषयक अंधत्वाची कारणे अलिकडच्या वर्षांत केराटायटिस सारख्या संसर्गजन्य रोगांपासून डोळ्यांच्या आघात आणि डोळ्यांच्या इतर गुंतागुंतींमध्ये बदलली आहेत. परंतु विशेषतः ग्रामीण भागात डोळ्यांच्या देखभालीवर मर्यादा येते, तेथे दृष्टीसंबंधी समस्यांचा ताण लक्षणीय आहे. अशी माहिती मुंबई येथील वडाळा डॉ. अगरवाल्ज आय हॉस्पिटलचे कॅटरॅक्ट सर्जन डॉ. स्मित बावेरिया यांनी सध्या सुरू असलेल्या अंधत्व जागृती महिन्यात दिली.
केराटायटिस सामान्यतः सौम्य जळजळ, लालसरपणा किंवा दृष्टीदोषापासून कॉर्नियावर गंभीर व्रण किंवा अपारदर्शकतेपर्यंत वाढत जातो. ज्यामुळे उपचार न केल्यास आंशिक किंवा संपूर्ण दृष्टी नष्ट होते. त्यामुळे लवकर हस्तक्षेप करणाऱ्या रूग्णांमध्ये, विशेषतः ज्यांना संसर्ग झाला आहे किंवा किरकोळ दुखापत झाली आहे ज्यांनी अद्याप कॉर्नियाचे खोलवर नुकसान केले नाही अशा रूग्णांमध्ये उपचार सर्वात प्रभावी आहे. वेळेवर उपचार न झाल्यास, अनेक रुग्णांना, विशेषतः ग्रामीण किंवा दुर्गम भागात, बरा न होणाऱ्या अंधत्वाचा सामना करावा लागतो.
या स्थितीबद्दल बोलताना,डॉ. अग्रवाल्स आय बॅंक, चेन्नईच्या वरिष्ठ कॉर्निया आणि अपवर्तक सर्जन, वैद्यकीय डायरेक्टर, डॉ. प्रीती नवीन म्हणाल्या, “कॉर्नियलसंबंधी अंधत्व हे भारतात दृष्टी गमावण्याला जबाबदार असे एक महत्त्वाचे कारण आहे. ज्यामुळे सुमारे १२ लाख लोक ग्रस्त आहेत. भारतातील कॉर्नियाविषयक अंधत्वाचे उच्च प्रमाण प्रामुख्याने ट्रॅकोमा आणि केराटायटिस सारख्या संसर्गांमुळे, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील डोळ्यांच्या दुखापतीमुळे आणि अ जीवनसत्त्वाच्या व्यापक कमतरतेमुळे आहे. स्वच्छतेचा अभाव, विलंबित वैद्यकीय हस्तक्षेप आणि विशेषतः ग्रामीण भागात आरोग्यसेवेची मर्यादित उपलब्धता ही समस्या आणखी वाढवते. कुपोषण, वारंवार होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापती आणि मर्यादित आरोग्यसेवा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील मुले आणि कामकाजी वयातील प्रौढ विशेषतः दृष्टी गमावून बसतात. डीजनरेटिव्ह आय स्थितीमुळे वृद्ध व्यक्तींनाही धोका असतो. एकंदरीत, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे १-२% लोकांना कॉर्नियल अंधत्व होण्याचा धोका आहे.
“भारतातील कॉर्नियासंबंधी अंधत्वाच्या सध्याच्या निदान पद्धतींमध्ये डोळ्यांची सर्वसमावेशक तपासणी, दृश्य तीक्ष्णता चाचणी आणि स्लिट-लॅम्प बायोमाइक्रोस्कोपी यांचा समावेश आहे. ज्यामुळे नेत्ररोगतज्ज्ञांना पारपटलीय स्पष्टतेचे मूल्यांकन करता येते आणि केराटायटिस, अल्सर किंवा व्रण यासारख्या परिस्थिती ओळखता येतात. अँटीरियर सेगमेंट ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी (एएसओसीटी) आणि कॉर्नियल टोपोग्राफी यासारखी प्रगत इमेजिंग तंत्रे कॉर्नियाची जाडी आणि पृष्ठभागाच्या अनियमिततेचे तपशीलवार मूल्यांकन उपलब्ध करून देतात.
ज्यामुळे अचूक निदान करण्यास मदत होते. मधुमेह किंवा गंभीर रोगप्रतिकारक विकारांपायी दृष्टी पूर्ववत होणे कठीण बनते मात्र अशास्वरुपाच्या लक्षणीय आरोग्य परिस्थिती नसलेल्या व्यक्तींमध्ये कॉर्नियल प्रत्यारोपण किंवा उपचारात्मक हस्तक्षेप देखील अत्यंत यशस्वी आहेत”, असे डॉ. प्रीती नवीन पुढे म्हणाल्या.
डॉ. अगरवाल्ज आय हॉस्पिटल, बंगळुरू येथील कॉर्निया आणि रिफ्रेक्टीव्ह आय सर्जन डॉ. संजना वत्स म्हणाल्या, तरीच योग्य प्रवेश मिळण्यातील आव्हाने आणि आरोग्य देखभालीत असणाऱ्या त्रुटी या सातत्यपूर्ण तसेच लक्ष्यकेंद्री हस्तक्षेपाची गरज अधोरेखित करतात. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना दर्जेदार डोळ्यांची देखभाल मिळू शकत नाही. ज्यामुळे वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्यांच्या कॉर्नियाचा उपचार अशक्य बनतो. त्याशिवाय आरोग्य देखभाल देणाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच स्रोत यामध्ये लक्षणीय तूट असल्याने कॉर्नियाचे व्यवस्थापन आणि उपचार प्रभावीपणे करणे हाताबाहेर गेलेले असते. कॉर्निया दात्यांची वानवा हा देखील एक मुख्य अडथळा आहे. कारण कॉर्निया प्रत्यारोपणाचे काही कार्यक्रम घेतले जातात. दृष्टीदान आणि कॉर्निया प्रत्यारोपण प्रचाराचे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. आजच्या घडीला जवळपास २ लाख प्रत्यारोपण आवश्यक असताना वर्षाला केवळ २५ हजार ते ३० हजार कॉर्निया दान होताना दिसते. गरीबी आणि कुपोषण यांसारखे सामाजिक-आर्थिक घटक कॉर्नियासंबंधी अंधत्वाचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे व्यापक प्रतिबंध आणि उपचार रणनीति राबविणे कठीण होते.
“भारतातील कॉर्नियाशी निगडीत अंधत्वाच्या घटना कमी करण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोन आवश्यक आहे. वैयक्तिक स्तरावर, डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढवण्याची गरज आहे. प्रारंभिक अवस्थेत समस्या ओळखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी नियमित नेत्र तपासणीस प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. नेत्र आरोग्य शिक्षण आणि कॉर्निया दानाचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम सुरू केल्याने लोकसहभाग वाढू शकतो. पोषण कमतरता दूर करण्यासाठी कार्यक्रम राबविणे, विशेषत: असुरक्षित लोकांमध्ये जीवनसत्व अ पूरक आहार, कॉर्नियाशी संबंधित समस्या कमी करू शकतात,” असे डॉ. वत्स म्हणाल्या.