मुंबई:जम्मू व काश्मीरमध्ये उत्पादन प्लांट उभारणारी भारतातील पहिली नवीकरणीय ऊर्जा कंपनी. ग्रुव एनर्जी प्रा. लि. ही चिरीपाल ग्रुपची प्रमुख उद्यम कंपनी जम्मू व काश्मीरमध्ये तीन-स्तरीय पूर्णत: बॅकवर्ड एकीकृत उत्पादन प्लांट उभारण्यास सज्ज आहे. ४५०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यासह बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या अल्ट्रा-मॉडर्न प्लांटची ३.२ गिगावॅट उच्च-कार्यक्षम मॉड्यूल्स आणि २.८ गिगावॅट इनगॉट्स, वेफर्स व सेल्स उत्पादित करण्याची वार्षिक क्षमता असेल. ग्रुव जम्मू राज्यामध्ये उत्पादन प्लांट उभारणारी भारतातील पहिली नवीकरणीय ऊर्जा कंपनी आहे. कथुआमध्ये स्थित हा प्लांट जागतिक दर्जाच्या ऑटोमेटेड मशिनरीसह आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असेल, ज्यामुळे ग्रुव असे अद्वितीय तंत्रज्ञान व अत्याधुनिक उत्पादन सुविधा असणारी भारतातील पहिली सोलार कंपनी ठरेल.
कंपनीने प्लांटमध्ये भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग व्हर्च्युअली असून ग्रुव एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक विनय थदानी, ग्रुव एनर्जीचे सीओओ हरदीप सिंग आणि चिरीपाल ग्रुपमधील वेदप्रकाश चिरीपाल, ज्योतीप्रसाद चिरीपाल, जयप्रकाश चिरीपाल आणि ब्रिजमोहन चिरीपाल आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
ग्रुवने आपल्या दुसऱ्या उत्पादन युनिटसाठी लोकेशन म्हणून कथुआची निवड करत जम्मू व काश्मीरच्या आर्थिक स्थितीसाठी नवीन मार्ग खुले केले आहेत. एकूण ८० एकर जागेवर पसरलेला हा प्लांट ग्रुवला जम्मू व काश्मीर, लडाख, इतर आसपासची राज्ये आणि मोठ्या प्रमाणात देशाच्या वाढत्या सौर गरजांप्रती भावी मागण्यांची पूर्तता करण्यास सक्षम करेल. कंपनी समुदायांना सक्षम करण्यासाठी, रोजगार संधी वाढवण्यासाठी आणि राज्याच्या तरूणांना अपस्किल करण्यासाठी सकारात्मक परिवर्तनाला देखील चालना देईल.
ग्रुव एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक विनय थदानी म्हणाले, ‘ग्रुवमध्ये आम्ही या परिवर्तनात्मक प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत असताना आमच्या उपक्रमाचे स्वागत करण्यासह पाठिंबा देण्यासाठी सरकारचे आभार व्यक्त करतो. नवीन प्लांट राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये भर करण्यासोबत भारताचे निव्वळ शून्य लक्ष्य पूर्ण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावेल. या प्लांटमुळे जम्मू आणि काश्मीरमधील व्यक्तींसाठी रोजगार संधी देखील निर्माण होतील. आमच्या कथुआ प्लांटची स्थापना आणि जयपूर, राजस्थानमधील आमच्या विद्यमान २.८ गिगावॅट मॉड्यूल उत्पादन प्लांटसह ग्रुव आर्थिक वर्ष २५ पर्यंत मॉड्यूल्ससाठी एकूण ६ गिगावॅट उत्पादन क्षमता आणि सोलार घटकांसाठी २.८ गिगावॅट उत्पादन क्षमता संपादित करेल.’
भावी तंत्रज्ञान व कुशल कर्मचारीवर्गासह ग्रुव या भारतातील सर्वात नवीन, पण झपाट्याने उदयास येत असलेल्या कंपनीचा अपवादात्मक दर्जाची उत्पादने प्रदान करण्याचा आणि मार्च २०२५ पर्यंत उच्च-स्तरीय डॉमेस्टिक कन्टेन्ट रिक्वॉयरमेंट (डीसीआर) मॉड्यूल्सची स्वावलंबी सोलार उत्पादक बनण्याचा मनसुबा आहे. कंपनी भारताला जगातील नेक्स्ट रिन्यूएबल सुपरपॉवर म्हणजेच भावी नवीकरणीय ऊर्जा महासत्ता बनवण्यासाठी नवीकरणीय पायाभूत सुविधा प्रबळ करत ऊर्जा स्वावलंबीत्व संपादित करण्याप्रती कटिबद्ध आहे.