ठाणे: गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत सोहळा ठाणे येथील घोडबंदरच्या ‘पार्कवूड्स’मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी गुढीपाडवा सण दोन सत्रात करण्यात आला. सकाळचा सत्रात गुढी पूजनानंतर हिंदूंची बाईक रॅली, ढोल ताश्याच्या गजरात प्रभात फेरी व नंतर मराठामोळ जेवण तर संध्यकाळच्या सत्रात विविधरंगी आणि बहुढंगी असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्याला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.