सन्माननीय योगायोग…

आगळा-वेगळा रंगकर्मी डाॅ.विजयकुमार देशमुख

मुंबई: दिवाळी असो वा बँक हाॅलिडे असो, लागोपाठ तीन दिवस सलग सुट्या आल्यातर… अगदी हाच योगायोग एखाद्या रंगकर्मीच्या आयुष्यात आला तर… तो दुर्मिळ योग! असा योग संवेदनशील नाट्यलेखक, दिग्दर्शन आणि अभिनेते मुंबईतले रंगकर्मी डाॅ. विजयकुमार देशमुख म्हणजे यांच्या कला जीवनात आलाय. त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून २९ नोव्हेंबर २०२४ ला शिवाजी मंदिर इथं मराठवाडा गौरव सन्मान, ३० नोव्हेंबरला ” ना ते आपुले ” या नाटकाला उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठीचा ‘रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार’ दादर माटुंगा सांस्कृतिक सभागृहात झाला. तर १ डिसेंबरला कला क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार आणि प्रकट मुलाखत नागपूरच्या धनवटे हॉल येथे संपन्न होणार आहे.