अंतराच्या येण्याने एजे- लीलाच्या नात्यात काय बदल येणार…

मुंबई:’नवरी मिळे हिटरला’ मालिकेत एकाचवेळी खूप काही घडामोडी दिसत आहेत. घरात गुढीपाडवा साजरा होत आहे आणि त्या सोबतच घरात एक गोड बातमी ही येणार आहे. तर दुसरीकडे एजेच्या पहिल्या बायकोने म्हणजेच अंतराने मालिकेत पुन्हा एन्ट्री घेतली आहे. अंतराच्या येण्याने एजे-लीलाच्या नात्यात काय बदल घडतील वेळच सांगेल. पण सध्या गुढीपाडवा दोघे एकत्र साजरा करत आहेत . एजे आणि लीला गुढी उभारतात. सकाळपासून लीलाच्या हातून काही ना काही विचित्र गोष्टी घडतायत, त्यामुळे सरोजिनीला वाटतंय काहीतरी अपशकुन घडणार आहे. एजे, लीला आणि सरोजिनी मंदिरात गेले असताना, सरोजिनीला अचानक अंतरा दिसते. तर एजेला वाटतंय की लीला त्याचा वाढदिवस विसरली आहे पण लीला जेव्हा त्याच्यासाठी केक घेऊन येते जो पुन्हा एजेच्या चेहऱ्यावर पडतो आणि जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात. दोघेही आनंदी आहेत. लीला एजेच्या वाढदिवसासाठी ग्रँड सेलिब्रेशन प्लॅन करते. घरात गोड बातमी आहे ज्यासाठी लीला एका खास पोस्टर बनवते आणि ती एजेला ते उघडण्यास सांगते. त्यामध्ये कुटुंबातील सर्व स्त्रिया एका बाळाची काळजी घेताना दिसत आहेत. या खास प्रसंगी एजे ५१% व्यवसाय समभाग लीलाला देण्याची घोषणा करतो. घरात इतकं आनंदाचं वातावरण असताना सर्व कुटुंब मिळून एक खास गाण्यावर डान्स करणार आहेत.

लीला म्हणजेच वल्लरी विराजने या गाण्याच्या शूटचा किस्सा ऐकवताना सांगितले “धिक ताना धिक ताना गाणं आम्ही शूट केल ते शूट करताना आम्हाला खूप मज्जा आली. आम्ही ते संपूर्ण गाणं एका तासात शूट केले. आमच्या मालिकेत सर्वांना नाचायला खूप आवडत तर हे गाणं शूट करणं आमच्यासाठी एक मजेशीर गोष्ट होती. सनी आमचा कोरिओग्राफर त्याने आम्हाला डांस स्टेप्स दाखवल्या आणि आम्ही पटापट करत गेलो तेही वन-टेक. मधल्या कट मध्ये आम्ही प्रॅक्टिस करत होतो जेणेकरून टेक करताना चुका कमी व्हाव्यात. एक गमतीचा किस्सा सांगायचा झाला तर आमचा डान्स सुरु असताना भारती ताई आणि राकेश बापट यांना वाटलं की सगळे डान्स करत आहेत पण ते दोघे नाहीत. मग भारती ताई, सनीला म्हणाल्या कि आम्हाला का बाजूला उभं केले आहे. पहिल्यांदा आमची पूर्ण कास्ट एकत्र डान्स करत होती. प्रत्येक शॉट नंतर आम्हाला फक्त, आणि फक्त हसू येत होतं. आम्हा सगळ्यांना प्राण्यांचे मुखवटे दिले होते आणि लहान मुलांची खेळणी ही आणली होती. आम्ही शूट कट झाल्यावर त्या खेळण्यांनी खेळत होतो.”

लीला आणि तिच्या परिवाराच्या आनंदाला कोणाची वाईट नजर लागेल ? अंतराच्या येण्याने एजे- लीलाच्या नात्यात काही बदलेल का ? बघायला विसरू नका “नवरी मिळे हिटलरला” सोमवार – शनिवार रात्री ११:०० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.