आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांची घेतली भेट!

मुंबई: क्रिकेटला लॉस एंजेलिस २०२८ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये आणि त्यानंतरच्या स्पर्धांमध्ये समाविष्ट करण्यासाठीचा गतीने वाढणारा पाठिंबा सुरूच आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (ICC)अध्यक्ष जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे(IOC) अध्यक्ष थॉमस बॅच यांची या आठवड्यात स्वित्झर्लंडच्या लॉझेन येथे भेट घेतली.