२२व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेत श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिरला ४रौप्य आणि ८कांस्य पदके!

मुंबई: पुणे येथे पार पडलेल्या २२व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेत श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिर शाळेच्या चमुने ४रौप्य आणि ८कांस्य पदकांसह एकूण १२ पदके पटकावली. लाठीकाठी प्रशिक्षक सुग्रीव पांडेकर व आरती पांडेकर यांनी विद्यार्थ्यांना लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले. शाळेचे मुख्याध्यापक संतोष टक्के यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.