मुंबई: देशातील आघाडीचा लॉटरी ऑपरेटर, डियर लॉटरीने लोकांना करोडपती बनवण्याचा विक्रम केला आहे. मागील पाच वर्षांत त्यांनी ३,००० हून अधिक कोट्याधीश घडवून मापदंड गाठला आहे. ज्यामुळे अनेकांचे जीवन उजळले. डियर लॉटरी लाइव्ह ड्रॉ हे संबंधित राज्य सरकारांद्वारे पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने जनतेला अखंडपणे उपलब्ध करून दिले जातात, ज्यामुळे वापरकर्त्याच्या अनुभवात भर पडते.
देशातील सर्वात मोठी सरकारी मान्यताप्राप्त लॉटरी कंपनी फ्युचर गेमिंगचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. मार्टिन म्हणाले, ‘लॉटरीची तिकिटे खरेदी करून कोट्याधीश बनणाऱ्या लोकांची संख्या आमची कार्यपद्धती आणि व्याप्तीबद्दल बरेच काही सांगते. आमच्या मेहनतीच्या जोरावर सरकारी आणि संचालित लॉटरी योजनांचे सर्वात मोठे वितरक बनलो आहोत. विश्वासार्हता हीच आमची ओळख आहे; तरी चालू आर्थिक वर्षात आम्ही आमची व्याप्ती वाढवत आहोत आणि लॉटरी प्रणाली सुधारण्याच्या दिशेने काम करत आहोत.’
डियर लॉटरी ही देशातील पहिली लॉटरी कंपनी आहे जी दूरचित्रवाणीवर ड्रॉ चे थेट प्रक्षेपण सुलभरित्या करते, ज्यामुळे पारदर्शकतेच्या माध्यमातून आमचा विश्वास वाढला तसेच आमची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढली आहे. आजच्या डिजिटल युगात, थेट ड्रॉ संबंधित राज्य सरकारच्या संकेतस्थळांवर रिअल टाइममध्ये दाखवले जातात. अशाप्रकारे लॉटरीत नशीब आजमावणाऱ्यांना डियर लॉटरी सुरक्षित वाटते, असे एस. मार्टिन म्हणाले.
आज लॉटरी उद्योग तिकीट विक्रीवर २८% जीएसटी आकारून अर्थव्यवस्थेत योगदान देतो. एकूण अंदाजानुसार देशभरातील लॉटरी उद्योगावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे १०,००,००० पेक्षा जास्त लोक अवलंबून आहेत. महिला आणि दिव्यांग लोकांना कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन सामाजिक – आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना सहाय्य पुरविण्यावर या उद्योगाचा भर आहे.
मार्टिन समूह हा विविध सरकारी मान्यताप्राप्त लॉटरी योजनांचा भारतातील सर्वात मोठा वितरक आहे. ती महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, नागालँड, सिक्कीम आणि गोव्यातील लॉटरी वापरकर्त्यांना सर्वात पारदर्शक पद्धतीने सेवा देते. त्यांना पारंपरिक कागदी लॉटरीचा ३० वर्षांहून अधिक अनुभव आहे, विविध सरकारी आस्थापना सोबत काम करण्याचा अनुभव आहे. तसेच वंचितांच्या जीवनात निर्णायक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कंपनी आपली व्याप्ती वाढवत आहे.