आंतरराष्ट्रीय योग दिन विद्यानिधी विद्यालयात साजरा

मुंबई: आंतरराष्ट्रीय योग दिनी उपनगर शिक्षण मंडळ संचलित व्रजलाल पारेख मराठी माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. एक पृथ्वी एक शरीर त्यासाठी योग या यावर्षीच्या संकल्पनेवर आधारित योग दिवस साजरा करण्यासाठी प्रगत योगशिक्षक व माजी विद्यार्थीनी काजल चव्हाण आणि ऑस्ट्रेलियामध्ये मल्लखांबावर आसनांची प्रात्यक्षिके केली असे आधुनिक व पारंपारिक (पॉवर योगा) प्रचलित योगशिक्षक अभिषेक सर आणि शाळेचे प्रतिनिधित्व करणारी योगशास्त्राचे वर्षा अत्तरदे यांनी वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना प्राणायाम सोपी स्मरणशक्ती वाढवणारी आसने व पॉवर योगासारखे ऊर्जादायी व्यायाम प्रकार शिकवले. अशाप्रकारे योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.