मुंबई: झी मराठीवर लवकरच ‘कमळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कमळीच्या वायरल झालेल्या शिवस्तुतीच्या प्रोमोची चर्चा सर्वत्र होत आहे. पण कमळी म्हणजेच विजया बाबरने हा प्रोमो शूट करतानाचा अनुभव सांगितला. ‘जेव्हा ही मी ढोल- ताशा पथक पाहायचे तेव्हा सुरुवातीला ते शिवस्तुती म्हणायचे मला ते खूप आवडायचं आणि तेव्हा नेहमी माझ्या मनात हा विचार यायचा कि आपल्याला ही शिवस्तुती यायला हवी, कारण ती घोषणा किंवा शिवस्तुती म्हणताना जो अंगावर काटा येतो सगळं एकदमच कमाल आहे. ‘कमळी’ च्या निम्मिताने मला शिवस्तुती पाठांतर करायला मिळाली आणि ती माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. खूप अभिमान आहे मला याचा कि मला महाराजांची शिवस्तुती पाठ आहे. याची प्रक्रिया कठीण होती मला पाठांतर करायला २ दिवस लागले. या दरम्यान मी सतत शिवस्तुती ऐकत होते. माझ्यासाठी हे एक आव्हान होत कारण योग्य उच्चार आणि वेळेत ते पूर्ण करायचं होत. सेटवर सर्वांनाच तो सीन-प्रोमो आवडला. आम्ही पूर्ण दिवस शूट करत होतो आणि माझा शिवस्तुतीचा जो भाग होता तो एकदम डे-लाईट जाण्याच्या आधीच शूट करायचा होता ते ही एक आव्हान होतं.’
‘कमळी’ लवकरच येत आहे तुमच्या भेटीला फक्त आपल्या झी मराठीवर.