मुंबई : भारतातील २६,००० हून अधिक पिन कोड पत्त्यांवर माल पोहोचता करणारा, डी२सी कंपन्यांसाठीच्या इत्यंभूत गरजा पुरविणारा, मल्टिपल कुरियर शिपिंग प्लॅटफॉर्म आयथिंक लॉजिस्टिक्सने आपल्या डॅशबोर्डवर ‘डार्क मोड’ ही नवीन सुविधा सुरू केल्याची घोषणा केली आहे. या नव्या सोयीमुळे यूजर्सना पांढऱ्या पार्श्वभूमी आणि गडद पार्श्वभूमी असलेल्या इंटरफेसमधून आपल्या आवडीचा इंटरफेस निवडता येणार आहे. कंपनीद्वारे आपल्या प्लॅटफॉर्मवर हा नवा बदल करण्यात आला आहे आणि ही सुविधा ग्राहकांना आणि या प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्या इतर व्हिजिटर्ससाठी खुली झाली आहे.
ही नवीन सुधारणा ताज्या ट्रेण्डनुसार तर आहेच, पण त्याचबरोबर यूजर्सचे आयुष्य आणि स्वास्थ्य अधिक चांगले बनविण्याचा हेतूही त्यामागे आहे. या अपडेटचे काही प्रमुख लाभ म्हणजे त्यामुळे वेबसाइटवरील अक्षरे अधिक चांगल्या प्रकारे वाचता येण्याेसाठी झाली आहेत. डार्क मोडचा पर्याय निवडल्यावर यूजर्सना फोनमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी करता येते, डोळ्यांवरचा ताण दूर होतो, स्क्रीन चमकत नसल्याने त्यामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता दूर होते आणि त्यांना आपल्या कामावर लक्ष एकाग्र करता येते. आयथिंकचा डॅशबोर्ड खूप तासांसाठी वापरणाऱ्या यूजर्सना याचा विशेष फायदा होणार आहे. डार्क मोडचे आरोग्यासाठी आणखी काही फायदे आहेत. जसे की यामुळे वारंवार डोकेदुखी होत नाही आणि नील प्रकाशकिरणांचा त्वचेवर नगण्य परिणाम होतो, त्यातून यूजर्सच्या झोपेच्या दर्जामध्ये सुधारणा होते. अंधारे वातावरण असल्यास अधिक चांगली झोप लागते असे संशोधनांतून सातत्याने दिसून आले आहे.
रंग आणि दृश्य घटक उठून दिसत असल्याने यूजर्सना स्क्रीनवरील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फरक करणे सोपे जाते. यामुळे अधिक चांगला कॉन्स्ट्रास्ट लूक मिळतो आणि यूजर्सच्या अनुभवातही सुधारणा होते. फोनबफद्वारे घेण्यात आलेल्या आयफोन यूजर्सच्या पाहणीनुसार डार्क मोड वापरणारे एखादा व्हिडिओ २० तासांसाठी चालवू शकले, त्या तुलनेत व्हाइट मोड वापरणाऱ्यांना फक्त १५ तास व्हिडिओ पाहता येतो. यातून कोणत्याही त्रासाशिवाय अधिक काळासाठी डिव्हाइस वापरण्याच्या बाबतीत डार्क मोडमध्ये असलेले संभाव्य फायदे अधोरेखित होतात.
यूजर्सना डार्क मोड निवडण्याचा पर्याय पुरवणे ही कंपनीसाठी एक उत्साहवर्धक बाब आहे, कारण तो दृश्यात्मकरित्या अधिक आरामदायी अनुभव देऊ करतो, डोळ्यांवरचा ताण कमी करतो, उपकरणाचा अधिक काळ वापर होण्याची शक्यता वाढते आणि इतकेच नव्हे तर झोपेचा दर्जा सुधारण्यामध्येही याची मदत होते. या अपडेटमुळे आमच्या यूजर्सच्या अनुभवात आणि एकूणच स्वास्थ्यामध्ये मोठी सुधारणा घडून येईल याची आयथिंक लॉजिस्टिक्सला खात्री आहे.