मुंबई : एसएआर ग्रुपची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी आणि पर्यावरणपूरक मोबिलिटी उत्पादने आणि सुविधा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी लेक्ट्रिक्स ईव्हीने दोन नवीन ईव्ही दुचाकी लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. या ईव्ही दुचाकींमध्ये तब्बल ९३ क्रांतिकारी वैशिष्ट्ये आहेत.
लेक्ट्रिक्स एलएक्सएस जी३.० आणि एलएक्सएस जी२.० इलेक्ट्रिक स्कुटर्स त्यांच्या तब्बल ९३ वैशिष्ट्यांसह शहरी मोबिलिटीमध्ये क्रांती घडवून आणतील. या स्कुटर्समध्ये ३६ सुरक्षा वैशिष्ट्ये, २४ स्मार्ट वैशिष्ट्ये, १४ कम्फर्ट वैशिष्ट्ये इत्यादींचा समावेश आहे. आपल्या प्रत्येक ग्राहकाला आधुनिक, सुरक्षित, इंटेलिजंट आणि कनेक्टेड मोबिलिटीचा लाभ घेता यावा हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
महत्त्वपूर्ण बाब अशी की, यातील अनेक वैशिष्ट्ये ईव्ही स्कुटर्सच्या या श्रेणीमध्ये पहिल्यांदाच आणली जात आहेत आणि बहुतांश ईव्ही दुचाकी कॅटेगरीच्या १ लाख रुपयांच्या परवडण्याजोग्या आणि स्पर्धात्मक किमतीच्या रेन्जमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध करवून देण्यात येत आहेत. स्कुटरचा विविध प्रकारे, पुरेपूर उपयोग करून घेता येईल अशा अनेक सुविधा, काटेकोरपणे परीक्षण करून तयार करण्यात आलेला, सर्टिफाईड प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक कनेक्टेड तंत्रज्ञान या सर्वांचा समावेश असल्यामुळे लेक्ट्रिक्स स्कुटर्स इतरांपेक्षा अनोख्या ठरतात.
इंटिग्रेटेड नेव्हिगेशन सिस्टिम, स्मार्ट सुरक्षा वैशिष्ट्ये, व्हॉइस असिस्टंट आणि अतिशय मजबूत चेसिस यांना तब्बल २.६ लाख किमीपेक्षा जास्त प्रवासात अनेक कठीण तपासण्या केल्यानंतर या स्कुटर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ही सर्व उच्च तंत्रज्ञान वैशिष्ट्ये या स्कुटर्ससोबत मिळणारा रायडींग अनुभव अजून जास्त वाढवतात.
या स्कुटर्समध्ये तंत्रज्ञानावर आधारित सुविधांचा लाभ घेता येतो, ऑटो-इंडिकेटर्स, स्मार्ट इग्निशन, हेल्मेट वॉर्निंग, वेहिकल डायग्नॉस्टिक्स, राईड स्टॅटिस्टिक्स, मोबाईल ऍपमार्फत रिमोट सीट ऑपरेटिंग, अँटी-थेफ्ट मेकॅनिजम इत्यादी या स्कुटरमधील अनेक सुविधा सध्या उपलब्ध असलेल्या अनेक ईव्हींमध्ये मिळत नाहीत.
लेक्ट्रिक्स ईव्हीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के विजय कुमार यांनी सांगितले, ‘एलएक्सएस जी स्कुटर्समध्ये तब्बल ९३ क्रांतिकारी वैशिष्ट्ये आहेत, जी जेन झेडच्या गरजा, आवडीनिवडी डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहेत. भारतातील जेन झेडला उत्तमप्रकारे कनेक्टेड असलेली गाडी हवी असते, म्हणूनच या स्कुटर्समध्ये स्मार्ट नेव्हिगेशन, श्रेणीमध्ये प्रथमच आणले गेलेले ऑटो-इंडिकेटर्स, ओव्हर द एअर अपडेट्स, फाईंड-माय-वेहिकल, इमर्जन्सी एसओएस बटन्स इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. युवकांना पाहताक्षणी आवडेल असे सुबक डिझाईन आणि आकर्षक, उठावदार रंग यामुळे ईव्ही स्कुटर्स अजून जास्त मोहक बनल्या आहेत.’