प्रीमियम एसयूव्ही – XUV 7XO साठी महिंद्राचे प्री-बुकिंग १५ डिसेंबर २०२५ ला दुपारी १२:०० वाजल्यापासून…

वसई: भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज त्यांच्या हाय-टेक, ट्रेंडसेटर, प्रीमियम SUV – XUV 7XO साठी प्री-बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. १५ डिसेंबर २०२५ ला दुपारी १२:०० वाजल्यापासून हे प्री-बुकिंग सुरू होणार आहे. ग्राहक बराच काळ या गाडीच्या प्रतीक्षेत होते. या SUV साठी INR 21000 च्या बुकिंग रकमेसह ग्राहक लवकर बुकिंगची सुविधा घेऊ शकतात.

प्री-बुकिंगच्या वेळी ग्राहकांना त्यांच्या पसंतीची डीलरशिप, इंधन प्रकार आणि ट्रान्समिशन निवडण्याची संधी मिळेल. XUV 7XO पेट्रोल आणि डिझेल या दोन इंधन पर्यायांसह सादर केले जाईल. तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या ट्रान्समिशनच्या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. सर्व महिंद्र डीलरशिप आणि कंपनीच्या ऑनलाइन चॅनेलवर प्री-बुकिंगची सुविधा उपलब्ध असेल.

अपडेट्स आणि नोंदणीसाठी, भेट द्या:

XUV 7XO साठी समाज माध्यम (सोशल मीडिया) हॅण्डल्स:

• ब्रँड वेबसाइट: Mahindra XUV 7XO
• इन्स्टाग्राम: Mahindra XUV 7XO
• एक्स(ट्विटर): Mahindra XUV 7XO
• यूट्युब: Mahindra XUV 7XO
• फेसबूक: Mahindra XUV 7XO