मीरा जवळील पवित्र कवडी पाहून मंजिरी हादरणार !

मुंबई: ‘तुला जपणार आहे’ मालिकेत मंजिरीला जाणवतंय की मीरामध्ये काहीतरी अद्भुत शक्ती आहे आणि ती तिच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करते. मात्र, शिवनाथच्या हस्तक्षेपामुळे मंजिरी थांबते. यामुळे मंजिरीला जाणवतं की ही लढाई तिच्या अपेक्षेपेक्षा अधिक कठीण आहे, कारण तिच्या विरुद्ध स्वतः महागौरी माता उभी आहे! या सगळ्या घडामोडींमध्ये मीरा हुशारीने वेदाला केस विंचरायला पटवते. पहिल्यांदाच वेदा नीट विंचरलेल्या केसांसह खाली येते. ही छोटीशी गोष्ट असली तरी वेदाला केस विंचरताना पाहून अथर्व मीराचे आभार मानतो आणि एक विनंती करतो की ती वेदाला प्रेमाने त्याला ‘बाबा’ म्हणायला आणि मिठी मारायला प्रवृत्त करशील का? मीरा हे मान्य करते. अथर्व, अंबिका, अनन्या आता या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सर्व गोंधळात मीराला वेदाच्या चित्रामध्ये एक भयंकर वाक्य दिसते. “माझ्या वडिलांनी माझ्या आईला मारलं!” हे पाहून मीरा हादरते. तिच्या मनात संताप निर्माण होतो. मंजिरी मीराला भावनिकरीत्या गुंतवत, “तू मला आपली मानतच नाहीस!” हे ऐकून मीरा हेलावते आणि तिच्याकडे असलेली पवित्र कवडी मंजिरीला दाखवते. मीराकडे कवडी आहे हे कळताच मंजिरी अस्वस्थ आहे आणि ती कवडी आपल्याकडे मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मीराचा विश्वास जिंकण्यासाठी मंजिरी एक डाव खेळते. ती नागनाथला बोलावून त्याची मीराशी भेट घडवून आणते. तिथे मंजिरी नागनाथला विश्वास देऊन सांगते की ती मीराची पूर्ण काळजी घेईल. हे ऐकून मीरा, मंजिरीला आपल्या आयुष्यात देवीसारखं मानायला लागते.

आता मीराला मंजिरीचा डाव कळेल? वेदाच्या चित्रात दडलेल्या रहस्याचा मीरा शोध लावू शकेल ? यासाठी बघायला विसरू नका ‘तुला जपणार आहे’ सोमवार – शनिवार रात्री १०:३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.