विद्या विकास मंडळ विद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा!

मुंबई: अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहाने साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लेझीम व ढोल ताश्यांच्या गजरात ग्रंथदिंडी सभागृहात आणली.
माजी शिक्षक स्व. कांदळगावकर सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील काव्य वाचन, अभिवाचन स्पर्धा, एकपात्री अभिनय व कथाकथन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यातील विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी पूजा अजिंक्य यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी मुलांशी संवाद साधताना त्यांनी मराठी शाळेत शिकत असल्याचा अभिमान बाळगा. मराठी भाषिक कौशल्ये विकसित करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न कसे करावे यावर मार्गदर्शन केले.

यावेळी विद्या विकास मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, कार्यवाह अमित पाटील, सभासद प्रफुल्ल म्हात्रे,शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.