मुंबई : सतीश सामुद्रे असे या ड्रायव्हराचे नाव असून हेच या चित्रपटाचे निर्माते व लेखक आहेत. सतीश सामुद्रे यांनी इथे पर्यंत पोहचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केला आहे.डोळ्यात चित्रपट क्षेत्रात येण्याचे स्वप्न पण हातात असलेली कुटुंबाची जबाबदारीमुळे गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करावे लागले, पण हा सर्व खडतर प्रवास पूर्ण करीत सतीश समुद्रे हे एक यशस्वी निर्माता बनले आहेत. निर्माते सतीश सामुद्रे यांचा ‘बबली’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
पॅशन मुव्हीज प्रस्तुत ‘बबली’ हा सिनेमा २३ जूनला प्रदर्शित होणार आहे.रोबर्ट मेघा यांनी ‘बबली’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. ‘बबली’ चित्रपट हा प्रसिद्ध हिंदी सिनेमा ‘बंटी और बबली’ शी मिळताजुळता नाहीये, हे अगोदरचं स्पष्ट करण्यात आलंय. ‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ या टॅगलाईननं चित्रपटाच्या कथानकाची कल्पना येते. चित्रपट जसाजसा पुढे सरकेल तसतशी वेगवेगळ्या वळणावर सिनेमा प्रेक्षकांना आश्चर्यचकित करेल, असं दिग्दर्शक रोबर्ट मेघा यांनी सांगितलं आहे.
चित्रपट मूळ प्रेम कथेवर आधारित आहे. कॉलेजमधलं प्रेम पुढे टिकतं का? बबलीला तिचं प्रेम मिळतं का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी तुम्हांला चित्रपट पाहावा लागेल. सिनेमाची गाणी प्रदर्शित झाल्यापासून तरुणांच्या पसंतीस उतरत आहेत.
गगन गजरलवार, मानसी सुभाष, विवान वैद्य, अनिरुद्ध चौथमोल ही चित्रपटाची स्टार कास्ट. ‘बबली’ चित्रपटाला प्रकाश प्रभाकर यांनी संगीत दिलंय. स्वप्नील बांदोडकर, मोहम्मद इरफान आणि वैशाली माडे, सरोदी बोरा आणि प्रकाश प्रभाकर यांनी चित्रपटाची गाणी गायलीत. चेतन रघू चौधरी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
प्रदीप कुमार वर्मा यांनी सहदिग्दर्शन, शिवा राव यांनी छायांकनाची जबाबदारी पेलली आहे. सिद्धेश प्रभू यांनी सिनेमाचं संकलन केलंय. बबली या सिनेमाचे कार्यकारी निर्माता योगेश डगवार आहेत. नृत्यदिग्दर्शक मयूर अहिरराव यांनी काम पाहिले आहे. चित्रपटाचे एडिटर सिद्धेश प्रभू आहेत.
कलाकारांचं कॉसच्यूम डिझायनिंग प्रीती चौधरी यांनी केलंय. कपिल जोशी चित्रपटाचे कलादिग्दर्शक आहेत.पॅशन कास्टिंग एजन्सीनेही सिनेमात कास्टिंगचं काम पहिलंय. नवनीत वर्मा यांनी प्रॉडक्शन व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळली आहे. शेषपाल गनवीर यांनी संहिता प्रमुख काम पाहिलं आहे. तुषार गिऱ्हे आणि तुषार मोरे चित्रपटाचे असिस्टंट दिग्दर्शक आहेत.