मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक शाळेत मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पूर्णपणे ८वीच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या वर्गशिक्षकांनी नियोजित केला होता. मुख्य पाहुणे म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार विजेते कवी,लेखक व विद्यानिधी सिद्धिविनायक शिशुमंदिरचे शिक्षक मोहन वाघ आणि विशेष अतिथी म्हणून वार्ड ६७ चे नगरसेवक दीपक कोटेकर उपस्थित होते. दीपक कोटेकर यांनी मराठी जिद्द कायम ठेवण्याचे आवाहन केले, तर मोहन वाघ यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत शिकत असल्याचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. त्यांनी “माझी शाळा” हा शब्द वापरायला सांगितला, जो अधिकार आणि जबाबदारीची भावना देतो. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली. संत ज्ञानेश्वरांचे निवडक अभंग वाचन, पुस्तक परीक्षण,लेखक कवी परिचय, मराठी प्रतिशब्द प्रश्नावली, गीत, कविता वाचन, संगीत ,इतर स्पर्धेत उच्चांक मिळालेल्या विद्यार्थांचा गौरव अशा विविध कार्यक्रमांनी कार्यक्रम रंगला.या कार्यक्रमातच शाळेचा सितारा वर्ग देखीलनिवडण्यात आला . विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रस्तुतीकरण केले. कार्यक्रम यशस्वी झाला.