मुंबई : मेलोरा भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या डी२सी ब्रॅण्डने भारतातील पहिलेच जेण्डर फ्लूइड फाइन ज्वेलरी कलेक्शन लाँच केले आहे. या जेण्डर फ्लूइड कलेक्शनमध्ये चेन, बांगड्या, ब्रेसलेट, कानातले, पेंडेंट व अंगठ्या असलेल्या ४० सोन्याच्या आणि डायमंड ज्वेलरी आभूषणांचा समावेश आहे.
उत्तम कलाकृती आणि उत्तमरित्या डिझाइन केलेली ज्वेलरी आभूषणे २२ कॅरेट, १८ कॅरेट व १४ कॅरेट प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. २० हजार रूपयांपासून सुरू होणारे हे कलेक्शन जेण्डर फ्लूडिटीचा अवलंब करणाऱ्यांसाठी पर्यायांची व्यापक श्रेणी देते. ‘बी फ्लूइड, बी यू’ या शक्तिशाली संदेशासह या कलेक्शनचा ज्वेलरीसंदर्भात लैंगिक अडथळ्यांना दूर करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे हे कलेक्शन जेण्डर न्यूट्रलिटीच्या जागतिक ट्रेण्डशी संलग्न होऊ शकेल.
या ट्रेण्डने झेंडया, जे होप, तिमोथी चॅलमेट, हॅरी स्टाइल्स, लिली सिंग आणि रणवीर सिंग यांसारख्या लोकप्रिय सेलिब्रिटींचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यांनी नीडरपणे या सक्षम करणाऱ्या स्टाइलला अंगिकारले आहे. टॉप फॅशन लेबल्स जसे सायमन रोचा, ल्यूडोविक डी सेंट सर्निन, मोन्से आणि पीटर यांनी देखील त्यांच्या जीवनप्रवासादरम्यान युनिसेक्स फॅशन दाखवली आहे, ज्यामधून जेण्डर-फ्लूइड डिझाइन्सप्रती वाढती स्वीकार्यता व मागणी दिसून येते.
मेलोराच्या डिझाइनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष दीपशिखा म्हणाल्या, ‘जेण्डर फ्लूइड कलेक्शन निश्चितच साप्ताहिक लाँचपैकी एक आहे, जे समाजावर सकारात्मक परिणाम घडवून आणेल. जेण्डर फ्लूइड कलेक्शन कोणत्याही विशिष्ट जेण्डरला न जुमानता लैंगिक रूढींना मोडून काढण्याचे सेलिब्रेशन आहे, हे कलेक्शन सर्वांना (जेण्डर्स) व्यापून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे, जे ग्राहकांना स्वयं-अभिव्यक्ती आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याची संधी देते, ज्यामधून त्यांची अद्वितीय ओळख आणि व्यक्तिमत्त्व दिसून येते. या कलेक्शनच्या माध्यमातून आमचा रूढींना आव्हान करण्याचा आणि असे क्षेत्र निर्माण करण्याचा मनसुबा आहे, जिथे सर्वांना पाहिले जाईल, त्यांचे ऐकले जाईल आणि त्यांची प्रशंसा केली जाईल.’
ज्वेलरीच्या या नवीन श्रेणीच्या माध्यमातून मेलोरा सर्वसमावेशक आणि अमर्याद भावना दर्शविणाऱ्या दागिन्यांसह विषम नियमांना आव्हान देण्याच्या प्रयत्नांना प्रशंसित करते. या मुक्त, आशावादी, सर्वसमावेशक, प्रयोगात्मक, साहसी आणि उत्साही मूडसह कलेक्शन ‘ग्लंज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅक्रो ट्रेण्डचे सार व्यापून घेते, ज्यामधून अँड्रोजिनस, मिश्रित सिल्हूट्स, स्कर्ट्स, सी थ्रू व नेट यांचे वर्णन दिसून येते.