‘मोठी झालीस तू’ स्त्रियांच्या ‘त्या चार दिवसांवरचे’ खास संवेदनशील नाटक!

पुणे:’मोठी झालीस तू’ हे जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रियांच्या ‘त्या चार दिवसांवरचे’ खास संवेदनशील नाटक. प्रा.देवदत्त पाठक लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक स्त्रियांच्या बाबतीतली संवेदनशीलता जपण्यासाठी लहानपणापासूनच त्यावर लक्ष केंद्रित करायला हे नाटक भाग पाडते. त्यासाठी तिच्या आयुष्यात येणारे महत्त्वाचे चार दिवस (मासिक पाळी) याबाबत योग्य अभ्यास करून ‘मोठी झालीस तू’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ८ मार्च महिला दिनानिमित्त झाला. विशेषता मुलींच्या शाळा आणि महाविद्यालय यासाठी हे प्रयोग मोफत केले जात आहेत. रंगभूमीवर पहिल्यांदाच मुलींच्या मासिक पाळी या विषयावरती हे नाटक धाडसाने होत आहे, पाळी आल्यानंतर घरातील वातावरण , मानसिकता तसेच शारीरिक देखभाल याबाबत अतिरेक व बुरसटलेला विचार न थोपावता मुलींची काळजी घ्यायला हवी, असे वातावरण निर्माण झाले नाही तर काय त्रास होऊ शकतो या विषयावरचे हे नाटक आहे, घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी परंपरेच्यां जोखडात न अडकता त्यावर त्यांनीच पुढाकार घेऊन काय वैद्यक पद्धतीचा लवचिक उपाय केला पाहिजे या विषयावरचे हे थेट भाष्य करणारे हे नाटक आहे.

पहिल्यांदा येणारी मासिक पाळी याबाबतचा बुरसटलेला विचार झटकून मुलींच्या मागे खंबीरपणे कसे उभे राहावे हे सांगणारे हे नाटक आहे. बुरसटलेपण, अट्टाहास नि भडकपणा टाळून लहान मुलीला कशा पद्धतीने हाताळावे याचे प्रबोधन या नाटकात होते. यासाठी सामाजिक संस्था किंवा समाजसेविका किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यातून त्यांना कसे बाहेर काढावे याबाबत घेतलेली केलेली हे धाडस आहे, या नाटकातून प्रबोधन आणि मनोरंजन व धाडस लेखक दिग्दर्शक प्राध्यापक देवदत्त पाठक आणि गुरू स्कूल गुफान च्या विद्यार्थ्यांनी केले आहे.अजूनही गाव, वस्त्यात आणि पाड्यांमध्ये मासिक पाळीबद्दलचे असलेले स्तोम, नसलेली जागरूकता, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, अडचणी भयानक आहेत. याबद्दल काळजीपूर्वक उपाययोजना करणे गरजेचे आहे.’जन्म बाईचा, बाईचा नको घाईचा’ असावा, सन्मानाचा मिळो स्वातंत्र्याचा असा विचार मांडणारे हे नाटक सगळ्यांनाच अंतर्भूत करतं.

यामध्ये गौरी पत्की,निर्मिती करपे, ऋतुजा केळकर, धनश्री गवस, अक्षता जोगदंनकर, अक्षदा वाघवसे,अर्णव देशपांडे अंतरिक्ष बेंद्र यां विद्यार्थ्यांनी काम केले आहे,नाटकाचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन मिलिंद केळकर यांनी केले आहे.तर निर्मिती प्रमुख उषा देशपांडे आणि सूत्रधार सीमा जोगदंनकर यांनी यातील निर्मितीचे कार्य सांभाळले आहे. या काळातही मासिक पाळी बद्दलचा विषय सुद्धा तितकाच जटील आहे हे विसरून चालणार नाही.स्त्री समानता, स्त्री शक्ती ,स्त्री स्वातंत्र याही बरोबर स्त्रीचे मन, शरीर, हे या काळात तंदुरुस्त होण्यासाठी चार दिवसांचे महत्त्व राहावे असा संदेश देणारे हे नाटक सर्वांनाच अंर्तमुख करते. जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रिया आणि स्त्रियांना वागवणाऱ्या समाजाला हे नाटक जागृत करेल हे निश्चित. यासाठी दर्शन पोळ, मल्हार बनसोडे अथर्व जाधव, आलोक जोगदनकर या गुरुस्कूल गुफांच्या विद्यार्थ्यांसह पालकांनीही मेहनत घेतली आहे .