मुंबई:शाश्वत आणि नैतिक पद्धतींवर भर देताना पारंपरिक भारतीय हातमाग हस्तकलांना प्रोत्साहन देणारा समानार्थी ब्रॅंड ‘मृदा’च्या (Mrida)वतीने मोठ्या अभिमानाने बुलबुल कलेक्शन फॉर समर-स्प्रिंग २०२४चे (Bulbul Collection for Summer-Spring 2024) अनावरण करण्यात आले. हातमागावर विणलेल्या माहेश्वरी साड्यांची ही उत्कृष्ट श्रेणी म्हणजे सर्जनशीलता, हातमाग नवकल्पना आणि प्रायोगिक अभिव्यक्तीचा उत्सव आहे. जी निसर्ग आणि कापड तसेच हस्तकलेच्या कारागीर पद्धतींपासून प्रेरणा घेते आणि त्याद्वारे भारताच्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वस्त्राचा आदर जपते.
उत्कृष्ट प्रतीच्या सुती रेशमाने तयार केलेली, बुलबुल कलेक्शनमधील प्रत्येक साडी अतिशय तलम, सर्वप्रकारे हलकी, त्वचेसाठी अनुकूल अशी अनुभूती देते. साडीच्या बाबतीत तिचे अंगीभूत सौंदर्य न गमावता ताजे आणि मातीशी मिळते-जुळते रंग, फिकट रंगसंगती आणि आकर्षक रंगछटांनी तयार झालेला मृदा बुलबुल कलेक्शन वसंत ऋतूतल्या उन्हाळ्याच्या उबदार तेजाला पूरक असे पॅलेट सादर करतो. बुलबुल कलेक्शन हा पक्ष्याचा उत्साही आवाज, गतिमान उपस्थिती आणि मैत्रीसाठी प्रसिद्ध बुलबुलच्या खेळकर तसेच सामाजिक स्वभावातून प्रेरणा घेतो. संग्रहातील प्रत्येक साडी या आनंदाच्या भावनेला मूर्त रूप देण्यासाठी तयार केली गेली आहे, ज्यात एक बोहेमियन स्वभाव आहे. जो आधुनिक स्त्रीला आकर्षित करतो. आजची स्त्री धाडसी, व्यक्त होणारी, सर्जनशील आणि स्वतःच्या वैयक्तिक फॅशनचा शोध घेण्यासाठी निर्भय आहे.
मृदा हा ब्रॅंड मूलभूत मूल्यांशी प्रामाणिक असल्याने, त्याची कलात्मकता, प्रामाणिकपणा आणि टिकाऊपणाविषयी अविचल बांधिलकी हाताने तयार केलेल्या ब्लॉक प्रिंटच्या स्वरूपात प्रदर्शित केली जाते. ज्यात गुंतागुंतीचे नमुने आणि डिझाईन्स दर्शविल्या जातात. सेंद्रिय रंगांचा वापर करण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. निवडक वस्तूंमध्ये प्रसिद्ध बाग प्रिंट्स आहेत, जे अधिक समकालीन व्हिज्युअल कॅनव्हासवर नवीन दृष्टिकोनाचा ठसा उमटवतो. समृद्ध भारतीय कापड वारसा जतन करण्यासाठी ब्रँडच्या समर्पणाचा पुरावा आहे! बुलबुल संग्रह हा खरोखरच भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील एक सुरेख संवाद आहे, ज्याचा उद्देश भारतीय हातमागाचा वारसा जतन करणे आणि भविष्यासाठी नाविन्याचा आहे. हा ब्रँड साडी परिधान करणाऱ्या व्यक्तीला स्वतःची अनोखी शैली आणि व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करण्यासाठी तसेच व्यक्त होण्याचे आमंत्रण देतो.
मृदा साडीच्या सह-संस्थापिका श्रिया नागी म्हणतात, ‘परंपरा आणि आधुनिकतेला साजेसे वस्त्र तयार करताना, बुलबुल कलेक्शन समकालीन फॅशनसह वारशाला सुसंगत असलेल्या ‘मृदा’च्या तत्वज्ञानाचा पुरावा म्हणून उभा आहे. आजच्या जीवनशैलीची गतिमान लय स्वीकारत भारताच्या कारागीर वारशाच्या भावनेला सामावून घेणारी ही आपली मूळ कथा आहे. ज्या महिलांनी आपल्या प्रगतीमध्ये भारताचे सार आणि स्वत:च्या अंतःकरणात आधुनिकतेची भावना बाळगली आहे, त्यांच्यासाठी हे कलेक्शन उपलब्ध करून देणे हा आमचा सन्मान आहे. बुलबुल कलेक्शन’मधील वैयक्तिक मूळांचे प्रतिबिंब पुढे एका हृदयस्पर्शी आख्यायिकेला जोडते. जी या वस्त्र-प्रवासात जिव्हाळा ओतते. बुलबुल हे नाव वडिलांनी खास माझ्यासाठी वापरले होते. लहानपणापासूनच हे माझे टोपणनाव होते. यामुळे एक आनंद आणि चैतन्य निर्माण झाले, जो वसा आजही माझ्यासोबत बाळगत आहे. हा संग्रह, अनेक प्रकारे, त्या आनंदी भावनेला आणि माझ्या बालपणीच्या प्रेमळ आठवणींना स्मरणांजली आहे.’
पर्यावरणीय परिणाम आणि मोठ्या प्रमाणात यंत्राद्वारे उत्पादनासाठी अनेकदा टीकेला सामोऱ्या जाणाऱ्या या उद्योगात, हातमागावर तयार करण्यात येणारा हा साडीचा ब्रँड त्याच्या प्लास्टिक-मुक्त आणि यंत्र-मुक्त उत्पादन प्रक्रियेचा अभिमान बाळगतो. जो केवळ हातमाग परंपरेच्या अखंडतेचे रक्षण करत नाही तर देशभरातील कुशल कारागिरांच्या उपजीविकेला हातभार लावतो.
बुलबुल कलेक्शन केवळ वस्त्र तुकड्याने स्वतःला सुशोभित करण्याबद्दल नसून आनंद, उत्साह आणि नैसर्गिक जगाशी जोडलेली जीवनशैली स्वीकारण्याबद्दल आहे. साडी परिधान करणाऱ्या स्त्रीचे व्यक्तिमत्व व्यक्त करण्यास आणि त्यांच्या सभोवतालच्या वातावरणासह बुलबुल पक्ष्याच्या जीवनासह त्याच उत्साहाने गुंतण्यास प्रोत्साहित करते. मृदाने विणलेले बुलबुल कलेक्शन पारंपरिक फॅशन सीमांच्या पलीकडे जाऊन सामाजिक सहभागाच्या मूल्यांमध्ये आणि जीवनाच्या साध्या सुखाच्या उत्सवात खोलवर रुजलेली कथा सादर करते.