विद्यानिधीत राष्ट्रीय विज्ञान दिन

मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कुल मराठी माध्यम शाळेत २८.०२.२०२६ ला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. ८वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी पाण्याचे रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि भूगोल या विषयांवर अध्ययन संस्थेच्या पुजा कदम यांचे प्रयोगांवर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्लास्टिक संग्रह करून १६ किलो संग्राहक कार्यालयात जमा करून पर्यावरण संवर्धनाचे काम केले . ६वी आणि ७वीच्या विद्यार्थ्यांनी ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी घनता, चुंबकीय रेषा, चुंबकाचे प्रकार, विरघळणे, वेगळे करणे इ. संकल्पनांवर विज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले. राष्ट्रीय विज्ञान दिनी सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेत कार्यक्रम यशस्वी झाला.