विद्या विकास मंडळ विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा!

मुंबई: अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहाने साजरा झाला. राष्ट्रीय विज्ञान दिन विद्या विकास मंडळ विद्यालय आणि मुंबई ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत साजरा करण्यात आला. इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी अन्नपदार्थांतील भेसळ कशी ओळखावी हे प्रात्यक्षिकांमधून दाखवले . मुंबई ग्राहक पंचायत अंधेरी जोगेश्वरी विभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्या मंगला गाडगीळ व ज्योती मोडक यांनी विद्यार्थ्यांना याविषयी अधिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्या विकास मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, कार्यवाह अमित पाटील, सभासद प्रफुल्ल म्हात्रे आदी उपस्थित होते.