मुंबई: भारतीय जनता पक्ष उत्तर मुंबई येथे “मोदी@९ संपर्क से समर्थन” या देशव्यापी उपक्रम अंतर्गत राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि आणि भाजप संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्या माजी खासदार डॉ.सुधा यादव यांच्या तीन दिवसीय दौरा समारोप दहिसर येथील विद्यामंदिर शाळेत खासदार गोपाल शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्या मार्गदर्शनाने लाभार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्या माजी खासदार डॉ.सुधा यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करून केंद्र सरकारच्या जनहितार्थ लाभार्थी योजनांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. त्यांनी उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मनीषा चौधरी यांच्या उल्लेखनीय लोकोपयोगी कार्याबद्दल कौतुकोद्गार काढले. विशेषत: मच्छीमार लाभार्थी, पारंपरिक पोशाख घालून तसेच मुस्लिम लाभार्थी भगिनी यांनी तीन तलाक मुक्तीसाठी धन्यवाद फलक घेऊन मोदी सरकारचे आभार व्यक्त केले. खासदार गोपाळ शेट्टी यांनी सर्व लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. या संदर्भात काही अनुभवही सांगितले.
आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर येथील उज्वला योजना, आयुष्मान कार्ड, जन धन योजना, मुद्रा लोन अशा केंद्र सरकारच्या दहिसर येथील लाभार्थ्यांची सांख्यिकी माहिती दिली. यावेळी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय आणि जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या संमेलनाचे सूत्रसंचालन उत्तर मुंबई सरचिटणीस बाबा सिंह यांनी केले आणि दहिसर सरचिटणीस विनोद शास्री यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला रघुनाथ कुलकर्णी, मुंबई उपाध्यक्ष युनुस खान, शलाका साळवी, दिलीप पंडित, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष योगीता पाटील, प्रसिद्धीप्रमुख निलाबेन सोनी, माजी नगरसेवक जगदीश ओझा,जितेंद्र पटेल, हरिश छेडा, विद्यार्थी सिंह,मंडल अध्यक्ष अरविंद यादव, दहिसर महिला आघाडी अध्यक्षा वृषाली बागवे, उत्तर मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.