मुंबई: गेल्या वर्षीच्या फेस्टिव्ह कलेक्शनला मिळालेल्या यशानंतर उत्कृष्ट कारागिरी आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेला आणि समृध्द वारसा असलेल्या प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँड ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे यावर्षी आपल्या लोकप्रिय ‘सप्तम’ आणि ‘इना’ कलेक्शनअंतर्गत नवीन डिझाइन्स सादर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पुन्हा एकदा बॉलिवूड आयकॉन माधुरी दीक्षित या मोहिमेचा चेहरा म्हणून असणार आहेत.
गेल्या वर्षीच्या डिझाईन्सना ग्राहकांच्या प्रतिसादाने प्रेरित होऊन, ‘पीएनजी ज्वेलर्स’ने ‘सप्तम कलेक्शन’चा विस्तार केला आहे. हे नवीन सप्तम कलेक्शन आनंद, समृद्धी, प्रेम, एकता, नवी सुरुवात, उत्साह आणि सौंदर्य या उत्सवाच्या सात भावना प्रतिबिंबित करून दागिन्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त करते. या कलेक्शनमध्ये कुंदन, जडाऊ, हिरे व पारंपरिक सोन्यामध्ये तयार करण्यात आलेले हार, कानातले, अंगठी, ब्रेसलेट इत्यादी उत्कृष्ट दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. या नवीन डिझाईन्सचा उद्देश भारतीय कलात्मकतेला समकालीन शैलीसह जोडून आधुनिक भारतीय महिलांची आवड व गरजांची पूर्तता करणे हा आहे. वारसा आणि भव्यता यांचा मिलाफ असणारे सप्तम कलेक्शन हे सणाच्या उत्साहाचे प्रतिक आहे.
‘पीएनजी ज्वेलर्स’ने नवीन ‘इना कलेक्शन’ सादर केले आहे. दिवाळीच्या काळात हिऱ्यांची चमक आवडणाऱ्या ग्राहकांसाठी नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांची नवीन निवड करता येणार आहे. आधुनिक लूकच्या शोधात असलेल्या महिलांना आकर्षित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ‘इना कलेक्शन’मध्ये आकर्षक कानातले ते बांगड्यांपर्यंत मोहक नवीन दागिने समाविष्ट आहेत, ज्यामुळे ग्राहकांना हा उत्सव शानदार शैलीत साजरा करता येईल.
‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, ‘गेल्या वर्षीच्या कलेक्शनला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि सणासुदीला वेधून घेणाऱ्या नवीन डिझाईन्स सादर करून हा क्षण साजरा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सप्तम आणि इना कलेक्शनमधील प्रत्येक दागिना हा आधुनिकता आणि परंपरा यांचा मिलाफ करून तयार केला गेला आहे. हे कलेक्शन ग्राहकांना अद्वितीय अनुभव प्रदान करणारे असेल.’
ब्रँड ॲम्बेसेडर माधुरी दीक्षित म्हणाल्या की, ‘मी नेहमीच सप्तम आणि इना कलेक्शनच्या अभिजाततेचे आणि सौंदर्याचे कौतुक केले आहे आणि या वर्षीच्या नवीन डिझाइन्स मोहित करणाऱ्या आहेत.मला विश्वास आहे की हे कलेक्शन उत्सव काळात आपल्या पेहरावातील सौंदर्यात भर घालून महिलांच्या नक्कीच पसंतीस पडेल.’
सप्तम आणि इना हे दोन्ही कलेक्शन ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व ४७ दालनांमध्ये उपलब्ध असेल. या उत्सव काळात ग्राहकांना विविध डिझाइन्स पाहता येणार आहेत. सणासुदीचा काळ आणखी संस्मरणीय बनवण्यासाठी ‘पीएनजी ज्वेलर्स’ने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफरही आणली आहे. यामध्ये ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ३० टक्क्यांपर्यंत सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सवलत दिली जाणार आहे.
‘पीएनजी ज्वेलर्स’ दिवाळीच्या उत्सव काळात ग्राहकांना उत्कृष्ट दागिन्यांमधून सणासुदीचा आनंद लुटण्याची सुवर्णसंधी तसेच आकर्षक ऑफर्सचा आनंद प्रदान करत आहे.