महिला दिनानिमित्त धाडसी नाटक ‘मोठी झालीस तू’

पुणे: महिला दिनानिमित्त मुलींच्या मासिक पाळीवरचे प्रबोधन आणि मनोरंजन करणारे धाडसी नाटक मोठी झालीस तू. नवनवीन अनोखे प्रयोग करणाऱ्या प्रा. देवदत्त पाठक लिखित आणि दिग्दर्शित गुरुस्कूलची ही निर्मिती आहे. प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक मिलिंद केळकर आहेत.

आपण सर्व एकविसाव्या शतकात जगत असलो तरीही विशेषतः मुलींची मासिक पाळी याबद्दलचा असलेला चुकीचा बुरसटलेला विचार आणि कर्मठपण यामध्ये वस्त्या,पाड्यात खेड्यात, गावात, मात्र याची योग्य ती जागृती व्हायला हवी. बाजूला बसलेल्या मुलीने विशिष्ट जागा, विशिष्ट कोपरा न सोडता ,बंद खोलीत राहण्याची बंधने यामुळे मुलींच्या मन बुद्धी शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि तो होतोही, यासाठी सामाजिक भान आणि वैद्यकशास्त्राचा योग्य तो आधार घेऊन एका समाजसेविकेने केलेली योग्य पद्धतीने या जटील प्रश्नाची हाताळणी अधोरेखित करणारे हे नाटक आहे, मोठी झालीस तू…

जन्म बाईचा नकोच घाईचा तर असू दे सन्मानाचा या उक्तीप्रमाणे या नाटकात बुरसटलेल्या विचारांना लाथाडून नव्याने या सर्व सृजनशील क्षमतेला कशा पद्धतीने हाताळावे याचे प्रबोधनात्मक आणि मगरंजक असे नाट्य म्हणजे मोठी झालीस तू. मध्ये बघायला मिळते. खरंतर हे धाडसच आहे ,रंगभूमीवर प्रथमच या विषयावरचे नाटक होत आहे.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने याचे शुभारंभाचे प्रयोग होत असून यात गौरी पत्की,निर्मिती करपे ,धनश्री गवस, अक्षदा वाघवसे ,ऋतुजा केळकर, अक्षता जोगदनकर,अर्णव देशपांडे, अंतरिक्ष बेंद्रे या विद्यार्थी कलाकारांनी भाग घेतलेला आहे, तसेच उषा देशपांडे, सीमा जोगदनकर, मल्हार बनसुडे, दर्शन पोळ, आलोक जोगदनकर, अथर्व जाधव यांचे रंगमंचीय व्यवस्थापन आणि तंत्र लाभलेले आहे , गुरुस्कूल गुफान ची ही निर्मिती रंगभूमीवर नव्या विषयांचे सादरीकरण होण्यासाठी आणि त्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे विचार प्रा.देवदत्त पाठक यांनी मांडले आहेत.