पुणे: जागतिक बाल रंगभूमी दिनानिमित्त अभिनय प्रशिक्षण देणारा अनुभव म्हणून नवीन नाटक गुरु स्कूल गुफान ही संस्था गुरुवारी २० मार्चला सायंकाळी साडेसहा वाजता सुदर्शन रंगमंच येथे शुभारंभीत करत आहोत.’ॲक्टर व्हायचे तुला’ हे नाटक पूर्णपणे अभिनयाची प्रशिक्षणाची प्रक्रिया मुलांपर्यंत शिबिर कार्यशाळातून देताना, येणारा अनुभव बरोबरच प्रत्यक्ष नाट्यकृतीच्या अनुभवातून मिळणारा हा अनुभव अभिनय करण्यासाठीची अचूक जाणीव देणारा आहे, या नाटकाचे हे वेगळेपण आहे.
एका संस्थेमध्ये विशेषतः गुरुकुल पद्धतीने चालणाऱ्या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेत येणाऱ्या मुलाबाबत त्याची व्यक्तिमत्त्वाची आणि क्षमतांची जडणघडण कशी होते आणि तो समाजामध्ये तंदुरुस्त वागला जावा आणि आपल्या क्षमतांना कसे उपयोगात आणावे हे समजून सांगणारे हे नाटक आहे. अभिनयाची आवड असेल तर त्याबाबत कशा पद्धतीचे कष्ट करायचे सातत्य ठेवायचे याचे रंजन आणि प्रबोधन करणारे हे नाटक आहे.
‘ॲक्टर व्हायचे तुला’ नाटकाचे लेखन दिग्दर्शन नेपथ्य प्रकाश आणि संगीत संकल्पना देवदत्त पाठक यांची आहे तर प्रमुख दिग्दर्शक मिलिंद केळकर आहेत. यामध्ये गुरुकुल गुफान या संस्थेचे विद्यार्थी कलाकार गौरी पत्की ,धनश्री गवस ,अक्षदा वाघवसे, अर्णव देशपांडे, मल्हार बनसोडे यांनी अभिनय सहभाग घेतला आहे. जागतिक बालरंगभूमी दिनानिमित्त मुलांना थिएटरकडे घेऊन चला, त्यांना नाट्यप्रयोग दाखवा, नाट्यप्रयोग दाखवल्यावर त्यांच्यामध्ये स्वतःतील कला अभिव्यक्ती गुण ओळखता येतील, प्रत्यक्षात कसे आणता येतील, याची काळजी घ्या. या संदेशाला सार्थ करण्यासाठी हे नाटक सर्वांसाठी शाळा, महाविद्यालय यामध्ये मोफत दाखवले जात आहे , बालरंगभूमी जर का प्रौढ रंगभूमीचा पाया असेल,तर हे नाटक बाल रंगभूमीच्या बरोबर अभिनयाचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष नाट्यनिर्मितीतून व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. या नाटकाचे सर्व दूर प्रयोग व्हावेत आणि शिबिर कार्यशाळा मधून अशा प्रकारचे प्रशिक्षण देताना या अभिनय प्रशिक्षणाच्या अनुभवाच्या नाटकाचे प्रयोग व्हावेत, असे विचार ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. देवदत्त पाठक यांनी मांडले आहेत.