मुंबई: महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट टियारा यांनी ५ डिसेंबर रोजी ‘ऑरेंज द वर्ल्ड’ मोहीम आयोजित केली होती. हा कार्यक्रम विद्यानिधी व्र. पा. हायस्कूल मराठी विभागात आयोजित करण्यात आला होता. तसेच मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक केजल जसानी यांनी ‘घरेलू हिंसा मुक्त भारत’ (हिंसामुक्त भारत) या विषयावर कार्यशाळा घेतली. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांवरील हिंसाचाराबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि हिंसाचारमुक्त समाजाला प्रोत्साहन देणे हा होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अध्यक्षा रोटरियन सोनाली पारीख यांनी भूषवले आणि क्लब सचिव उषा भुता यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी महिला पालकांना पौष्टिक नाश्त्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यीत आली.