मच्छिमार वंधव प्रबोधन मेळाव्याचे आयोजन!

नवी मुंबई: पनवेलमध्ये मच्छिमार बांधवाच्या वतीने मच्छिमार वंधव प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रिन्स पाईप्सचे अध्यक्ष जयंत छेड़ा यांच्या वतीने नगर रक्षक दल, ग्राम रक्षक दलातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यांना सुरक्षा जॅकेट आणि रेनकोट वितरित केले. या कार्यक्रमाला नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भरांबे, नवी मुंबई अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे आदी उपस्थित होते. प्रिन्स पाईप्सचे अध्यक्ष जयंत छेड़ा हे नेहमी सार्वजनिक आणि सामाजिक कार्यासाठी मदत करत असतात.