मुंबई: दागिने विश्वात उत्कृष्ट कारागिरीसाठी आणि विश्वासाहर्ता टिकवून ठेवणाऱ्या प्रसिद्ध ‘पीएनजी ज्वेलर्स’ने आपल्या ग्राहकांसाठी बहुप्रतीक्षित ‘चेन आणि बँगल्स महोत्सवा’ची सुरुवात केली आहे. या अनोख्या उत्सवात सोन्याच्या चेन आणि बांगड्यांचे एक सुंदर कलेक्शन सादर करण्यात येणार आहे. मर्यादित कालावधीसाठी असलेला हा विशेष महोत्सव ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असेल आणि स्टॉक संपेपर्यंत सुरू राहील. या महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षक किंमतीत भव्य आणि विविध प्रकारच्या डिझाइन्समध्ये दागिने खरेदी करण्याचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
‘चेन आणि बँगल्स महोत्सव’ हा पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या कलाकुसरीचे उत्तम मिश्रण असलेले एक खास कलेक्शन आहे. चेन आणि बांगड्या या दैनंदिन वापरातील महत्त्वाच्या दागिन्यांपैकी एक आहे. त्यांचे सौंदर्य आणि टिकाऊपणा प्रत्येक प्रसंगाला आणि उत्सवाला साजेसा असतो. याशिवाय, ग्राहकांना मेकिंग चार्जेसवर थेट १५% सवलत मिळणार असून, मोहक दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची ही सुवर्णसंधी आहे. हा संपूर्ण संग्रह उत्कृष्ट कारागिरीचा नमुना असून, शुद्धतेची चमक आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या विश्वासार्हतेसह सादर करण्यात आला आहे.
‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘पीएनजी ज्वेलर्स नेहमीच परंपरा आणि आधुनिकतेचा विचार करून ग्राहकांना आपली सेवा प्रदान करत आहे. चेन आणि बँगल्स महोत्सव हा आपल्या समृद्ध आणि सांस्कृतिक वारशाचा उत्सव आहे, जिथे प्रत्येक ग्राहकाला त्याच्या आवडीनुसार आणि शैलीशी सुसंगत असा परिपूर्ण दागिना मिळावा, ही आमची इच्छा आहे. विशेष कलेक्शन आणि आकर्षक ऑफर्ससह, हा उत्सव ग्राहकांसाठी संस्मरणीय ठरावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’